IPL 2026, PBKS vs MI : मुंबई इंडियन्सचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरने गुरुवारी (14 मे) पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये आपल्या धारदार बॉलिंगने नवा इतिहास रचला आहे. धरमशाला येथील मैदानावर झालेल्या या लढतीत शार्दुलने 4 ओव्हर्समध्ये 39 रन देऊन 4 विकेट्स घेतल्या. या चमकदार कामगिरीमुळे त्याने मुंबई इंडियन्सच्या एका खास क्लबमध्ये एन्ट्री केली असून, अशी कामगिरी करणारा तो गेल्या 15 वर्षांतील मुंबईचा पहिलाच बॉलर ठरला आहे.
शार्दुलची ऐतिहासिक कामगिरी
आयपीएल 2026 मधील मुंबई इंडियन्सच्या 12 व्या मॅचमध्ये शार्दुल ठाकूरने पंजाबच्या बॅटर्सना चांगलेच जखडून ठेवले. त्याने आपल्या विकेट्सचे खाते पंजाबच्या डावातील 12 व्या ओव्हरमध्ये उघडले. दुसऱ्या बॉलवर त्याने खतरनाक प्रभासिमरन सिंगला (57 रन) आऊट केले, तर त्याच ओव्हरच्या चौथ्या बॉलवर श्रेयस अय्यरचा बचाव भेदत त्याला क्लीन बोल्ड केले.
शार्दुलचा हा धडाका इथेच थांबला नाही. त्याने 14 व्या ओव्हरमध्ये सूर्यांश शेडगेला (8 रन) राज बावाकरवी कॅच आऊट केले. त्यानंतर 17 व्या ओव्हरमध्ये मार्को जानसेनला (2 रन) बोल्ड करत शार्दुलने त्याचे फोर-फर (4 विकेट्स) पूर्ण केले.
SHARDUL THAKUR PEACH TO REMOVE PBKS CAPTAIN SHREYAS IYER. 🤯🔥 pic.twitter.com/NzSlVCBUDu
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 14, 2026
15 वर्षांचा दुष्काळ संपवला
पंजाब किंग्सविरुद्ध एका मॅचमध्ये 4 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा शार्दुल हा मुंबई इंडियन्सचा केवळ तिसरा बॉलर ठरला आहे. यापूर्वी 2010 मध्ये लसिथ मलिंगाने 22 रन देऊन 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर 2011 मध्ये मुनाफ पटेलने 21 रन देऊन 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. मुनाफनंतर तब्बल 15 वर्षांनी एकाही मुंबईच्या बॉलरला पंजाबविरुद्ध 4 विकेट्स घेता आल्या नव्हत्या, तो विक्रम आता शार्दुलने करून दाखवला आहे.
( नक्की वाचा : Vinod Kambli: विनोद कांबळीच्या संघर्षाचा आईस्क्रीम कंपनीकडून सौदा? सोशल मीडियावर तीव्र संताप, काय आहे प्रकरण? )
मुंबईकडून शार्दुल ठाकूर व्यतिरिक्त दीपक चहरने 36 रन देऊन 2 विकेट्स घेतल्या. तर कॉर्बिन बॉश आणि राज अंगद बावा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. पंजाबचे बॅटर्स ठराविक अंतराने बाद होत असले, तरी त्यांनी निर्धारित 20 overs मध्ये 8 विकेट्स गमावून 200 रन्स केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world