जगप्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगाचा विनोद कांबळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून विनोद कांबळीचे चाहते अक्षरश: स्तब्ध झाले आहे.
नक्की वाचा - घट्ट धरलेला हात सोडेना, सचिनच्या डोक्यावरुन हात फिरवित राहिला; विनोद कांबळीचे Video पाहून चाहते स्तब्ध
या कार्यक्रमादरम्यान विनोद कांबळी स्टेजवर एका कोपऱ्यात बसला होता. सचिन तेंडुलकर समोर आल्यानंतर पुढील काही क्षण तो सचिनला ओळखूही शकला नाही. कांबळी अनैक वैद्यकीय आजारांचा सामना करीत असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी सचिन तेंडुलकरने स्टेजवर कांबळीची भेट घेतली. मात्र भारतीय टीमचा माजी कर्णधार कांबळीच्या मदतीसाठी पुढे आला आहे. आणि तो बरा होत नाही तोपर्यंत आर्थिक सहाय्य करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
विनोद कांबळी हा दारूच्या व्यसनातून अनेक शारिरीक आणि मानसिक त्रासांचा सामना करीत आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अम्पायरिंग केलेले कांबळीचा निकटवर्तीय मार्कस कोउटो यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, कांबळीला अनेक समस्या आहेत. कांबळी यापूर्वी १४ वेळा पुनर्वसन केंद्रात गेले आहेत. तीन वेळा आम्ही त्यांना वसईतील पुनर्वसन केंद्रात घेऊन गेलोय.
नक्की वाचा - विनोद कांबळीची अशी अवस्था पाहून मला रडू आलं! माजी सहकारी नखशिखांत हादरला
मदतीसाठी कपिल देव आले धावुन...
माजी गोलंदाज बलविंदर सिंह संधू म्हणाला, कपिल देवांनी स्पष्ट केलंय की, जर कांबळी पुनर्वसन केंद्रात जाण्यासाठी तयार असतील तर त्यांना आम्ही आर्थिक मदत करू. अशावेळी उपचार कितीही काळ सुरू असेल तरीही मदत करण्यात येईल. काही वर्षांपर्यंत विनोद कांबळी फिट होते. मात्र त्यांना लागलेल्या दारूच्या व्यसनामुळे ते सहकाऱ्यांपासून दूर गेले. आता कांबळी मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या अनफीट आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यात त्याना चालतानाही येत नव्हतं.