जाहिरात

विनोद कांबळीची अशी अवस्था पाहून मला रडू आलं! माजी सहकारी नखशिखांत हादरला

सचिन आणि विनोद कांबळी मुंबईतील शिवाजी पार्कात झालेल्या आचरेकर सरांच्या स्मारकाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटले. दोघांमध्ये अगदी काही सेकंद संवाद झाला.

विनोद कांबळीची अशी अवस्था पाहून मला रडू आलं! माजी सहकारी नखशिखांत हादरला

चालता येत नाही, बसल्यावर उठता येत नाही. नीट बोलताही येत नाही. बालपणीचा मित्र समोर उभा राहिला तर त्याला पटकन ओळखताही येत नाही अशी अवस्था माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची झाली आहे. जगप्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित असलेल्या विनोद कांबळीची अवस्था पाहून अनेकांना धक्का बसला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एकेकाळचा स्टायलिश आणि अत्यंत प्रतिभावान बॅटसमन म्हणून ज्याचा गौरव व्हायचा त्या विनोद कांबळीला अशा अवस्थेत पाहणं अनेकांना क्लेशदायी होतं. त्याच्यासोबत क्रिकेट खेळलेल्यांनाही त्याची ही अवस्था पाहावली नाही. विनोदच्या एका सहकाऱ्याने त्याच्याबद्दल बोलताना म्हटले की, आम्ही 14 वर्ष एकत्र खेळलो आहोत. त्याने मला बघता क्षणी मला ओळखलं आणि मला मिठी मारली. मला त्याची अवस्था पाहावत नाही. 

नक्की वाचा : सचिन-विनोदच्या भेटीचा VIDEO VIRAL, कांबळीची अवस्था पाहून नेटकऱ्यांचा तेंडुलकरवर संताप

माजी क्रिकेटपटू समीर दिघे यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटले की, "मी विनोदला बऱ्याच वर्षांनी पाहिले. तो उठला आणि 'सम्या' अशी हाक मारत त्याने मला मिठी मारली.मला त्याची अवस्था पाहावली नाही. मला फार वाईट वाटलं. माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. आम्ही मुंबईसाठी 14 वर्ष खेळलो होतो. त्याला चांगले आरोग्य लाभो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.

नक्की वाचा : मित्र असावा तर असा... सचिन तेंडुलकरनं घेतली विनोद कांबळीची भेट ! Video पाहून फॅन्स इमोशनल

विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर या दोघांना रमाकांत आचरेकर यांनी घडवलं. हे दोघेही जवळपास एकाच वयाचे आहेत. मात्र दोघांकडे पाहिल्यानंतर विनोद कांबळीने स्वत:चे काय हाल करून घेतले हे स्पष्टपणे दिसून येतं. सचिन आणि विनोद कांबळी मुंबईतील शिवाजी पार्कात झालेल्या आचरेकर सरांच्या स्मारकाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटले. दोघांमध्ये अगदी काही सेकंद संवाद झाला. सुरुवातीला विनोदने सचिनला ओळखलेच नाही, मात्र जेव्हा ओळखले तेव्हा त्याने उठून सचिनला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र विनोदच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने तसं करण्यापासून त्याला रोखलं आणि सचिनला तिथून जाण्यास सांगितलं.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: