जाहिरात

LSG vs KKR : 6,6,6,6 रिंकूने ठोकले एका पाठोपाठ 4 सिक्सर, लखनऊच्या फलंदाजांनीही केली कमाल, सुपर ओव्हर अन्..

आयपीएलचा 38 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये रंगला.

LSG vs KKR :  6,6,6,6 रिंकूने ठोकले एका पाठोपाठ 4 सिक्सर, लखनऊच्या फलंदाजांनीही केली कमाल, सुपर ओव्हर अन्..
KKR vs LSG, IPL 2026

KKR vs LSG Match Update :  आयपीएलचा 38 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये रंगला. लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या केकेआर संघाने धावांचा पाऊस पाडला नाही. लखनऊने सुपर ओव्हरमध्ये कोलकत्ता समोर 2 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना रिंकू सिंहने पहिल्याच बॉलवर चौकार मारून कोलकत्ता नाईट रायडर्सला हा सुपर ओव्हरचा सामना जिंकून दिला होता.त्यामुळे लखनऊने सूपर ओव्हरमध्ये सामना आणून देेखील त्यांना जिंकता आले नाही.

केकेआरला 200 धावांपर्यंतही मजल मारता आली नाही. 20 षटकांमध्ये केकेआरने 7 विकेट्स गमावून 155 धावा केल्या. त्यामुळे लखनऊपुढे 20 षटकांमध्ये 156 धावांचं आव्हान होतं. हे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनऊ संघाच्या फलंदाजांनी शेवटच्या षटकापर्यंत बाजी लावली. एका चेंडूत 7 धावांची अपेक्षा असताना मोहम्मद शामीने षटकार ठोकला अन् धावसंख्येची बरोबरी झाली. 

लखनऊसाठी सलामीवीर फलंदाज एडन मार्करमने 27 चेंडूत 31 धावा केल्या. तर मिचेल मार्श फक्त 2 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार रिषभ पंतने संघाची कमान सांभाळली. रिषभने 38 चेंडूत 42 धावा केल्या. पण त्यानंतर मैदानात उतरलेल्या निकोलस पूरन (9),मुकल चौधरीला (1) धावांचा सूर गवसला नाही.कोलकाता संघाच्या गोलंदाजांपुढे लखनऊच्या फलंदाजांनी नांगी टाकली. 

नक्की वाचा >> Mumbai Pune Expressway: मिसिंग लिंकचा मुहूर्त ठरला, टोलबाबत मोठा निर्णय, अपघात अन् विलंबाला कायमचा ब्रेक

रिंकू सिंगचा धमाका, 83 धावांचं वादळी अर्धशतक 

अनुकूल रॉय,वैभव अरोरा,कॅमरून ग्रीन,सुनील नरेन, वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी एक विकेट घेतली. तर लखनऊचा स्टार गोलंदाज मोहसीन खानने 4 षटकांमध्ये 23  धावा देत पाच विकेट्स घेतल्या. तर जॉर्ज लिंडेला फक्त एका विकेटवर समाधान मानावं लागलं. दरम्यान, कोलकाता संघासाठी सलामीवीर फलंदाज अजिंक्य रहाणेनं (10),टीम सायफर्ट (0),अंगकृष रघुवंशी (9),कॅमरून ग्रीन (34),रोवमन पॉवेल (1),तर रिंकू सिंगने अप्रतिम फलंदाजी करून 51 चेंडूत 83 धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली. यामध्ये 5 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश आहे.

नक्की वाचा >> 'त्या' कार्यकर्त्याने  CM देवेंद्र फडणवीसांना रक्ताने लिहिलं पत्र, पत्रात नेमकं काय? राजकीय वर्तुळात चर्चा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com