जाहिरात

'त्या' कार्यकर्त्याने  CM देवेंद्र फडणवीसांना रक्ताने लिहिलं पत्र, पत्रात नेमकं काय? राजकीय वर्तुळात चर्चा

विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. 30 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत.अशातच नेत्यांनी उमेदवारीसाठी राजकीय वर्तुळात मोठी फिल्डिंग लावल्याचं पाहायला मिळत आहे.

'त्या' कार्यकर्त्याने  CM देवेंद्र फडणवीसांना रक्ताने लिहिलं पत्र, पत्रात नेमकं काय? राजकीय वर्तुळात चर्चा
CM Devendra Fadnavis Viral Letter

संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी 

CM Devendra Fadnavis Viral Letter : विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. 30 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत.अशातच नेत्यांनी उमेदवारीसाठी राजकीय वर्तुळात मोठी फिल्डिंग लावल्याचं पाहायला मिळत आहे. माढा तालुक्यातील राहुल मदने या कार्यकर्त्याने दौलत शितोळे यांच्या उमेदवारीसाठी चक्क रक्ताने पत्र लिहिले.माढा तालुक्यातील टेंभुर्णी जवळील तांबवे गावचा पैलवान असणारा राहुल मदने याने रक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. 

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसी.माझा देव असणारा दौलत नाना शितोळे यांना विधान परिषदेवर संधी द्या." अशा आशयाचे रक्ताने पत्र लिहिले आहे.त्यामुळे विधान परिषदेवर उमेदवारी नक्की कोणाला मिळणार याच्या चर्चा मुंबईसह दिल्लीत आहेत.भाजपकडे दौलत शितोळे यांनी आपल्या नेत्यासाठी रक्ताने पत्र लिहून उमेदवारी मागितली. हा अवलिया कार्यकर्ता सध्या चांगला चर्चेत आहे. 

नक्की वाचा >> Abhishek Sharma Video : ती मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? जिने अभिषेक शर्माचा सर्वांसमोर हात पकडला अन् जे घडलं..

22 उमेदवारांची यादी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवली

विधान परिषदेच्या नऊ जागांमध्ये पाच जागा भाजपाकडे आहेत.भाजपाच्या कोर कमिटीने 22 उमेदवारांची यादी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवली.मात्र भाजप नेहमी धक्का तंत्राचा वापर करून नव्या उमेदवारांना संधी देते.याच अपेक्षेने दौलत शितोळे यांच्या उमेदवारीची मागणी होत आहे. नेत्यासाठी रक्ताने पत्र लिहिणारा कार्यकर्ता चर्चेत आल्यानंतर नक्की दौलत शितोळे कोण आहेत, याची चर्चा सुरू झाली.दौलत शितोळे हे पुणे जिल्ह्यातील राजकीय प्रस्थ आहे.

नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील महाळुंगे परिसरातील नागरिकांनी अलर्ट राहा,अखेर 'ती' महिला अडकली पोलिसांच्या जाळ्यात

देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते समजले जातात.जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून राज्यातील जवळपास 35 छोट्या छोट्या जातींना एकत्र घेऊन संघटना उभे करणारे शितोळे यांच्या उमेदवारीसाठी मागणी होत आहे. खास करून भटक्या विमुक्त जातीतील आदिवासी रामोशी समाजासारख्या लोकांमध्ये काम करणारे दौलत शितोळे यांच्यासाठी राहुल मदने याने रक्ताने पत्र लिहिले आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com