जाहिरात

Kuldeep Yadav Marriage: कोण आहे कुलदीप यादवची होणारी बायको वंशिका?ऑस्ट्रेलियाशी काय आहे कनेक्शन?

लग्नातील भोजनासाठी प्रति ताट 6000 रुपयांहून अधिक खर्च केला जात आहे. यामध्ये विशेषतः उत्तराखंडच्या स्थानिक 'पहाडी' खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.

Kuldeep Yadav Marriage: कोण आहे कुलदीप यादवची होणारी बायको वंशिका?ऑस्ट्रेलियाशी काय आहे कनेक्शन?
  • भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज कुलदीप यादव आपल्या बालपणीची मैत्रीण वंशिकाशी १४ मार्च रोजी विवाहबंधनात अडकणार
  • वंशिका कानपूरची रहिवासी असून ती ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षण घेत असून सध्या एका नामांकित कंपनीत काम करत आहे
  • विवाह सोहळा मसुरीमधील ऐतिहासिक हॉटेल सवाय येथे पार पडणार असून १३ मार्चला हळद आणि मेहंदीचे विधी पार पडतील
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Who is Vanshika? भारतीय क्रिकेट संघाचा 'चायनामैन' गोलंदाज कुलदीप यादव लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. कुलदीपची होणारी पत्नी वंशिका ही त्याच्या बालपणाची मैत्रीण आहे. दीर्घकाळाच्या नात्यानंतर आता हे दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत. वंशिका कानपूरची रहिवासी असून तिचे वडील योगेंद्र सिंह चड्ढा एलआयसीमध्ये कार्यरत आहेत. 2017 मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर वंशिका उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेली होती. सध्या ती तिथेच स्थायिक असून एका नामांकित कंपनीत कार्यरत आहे.

कुलदीप आणि वंशिका यांचा विवाह सोहळा मसुरीमध्ये पार पडणार आहे. ऐतिहासिक हॉटेल 'सवाय' या सोहळ्याचा साक्षीदार असणार आहे. 14 मार्च रोजी मुख्य विवाह सोहळा पार पडेल. तर तत्पूर्वी 13 मार्च रोजी हळद आणि मेहंदीचे विधी पार पडतील. या शाही विवाहात सुमारे 200 खास पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. पाहुण्यांच्या निवासासाठी जेडब्ल्यू मॅरियट आणि फॉर्च्युन हॉटेलमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज या लग्नाला हजेरी लावण्याची दाट शक्यता आहे.

नक्की वाचा - Cricket News: 'बुमराहला स्लोअर बॉल टाकायला मी शिकवलं' पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाच्या दाव्याने खळबळ

लग्नातील भोजनासाठी प्रति ताट 6000 रुपयांहून अधिक खर्च केला जात आहे. यामध्ये विशेषतः उत्तराखंडच्या स्थानिक 'पहाडी' खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. मडुव्याची भाकरी, लाल तांदूळ, गहतची डाळ आणि झंगोरेची खीर यांसारखे पदार्थ पाहुण्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतील. लग्नानंतर 17 मार्च रोजी लखनौमधील 'द सेंट्रम' हॉटेलमध्ये एक भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे.

नक्की वाचा - Cricket News: टीम इंडियाचा टी-20 कॅप्टन बदलणार! सूर्याच्या जागी 'हे' 3 खेळाडू शर्यतीत, BCCI चा नवा प्लॅन

कुलदीपने आपल्या लग्नासाठी मसुरीची निवड केली आहे. हॉटेल सवायमध्ये 80 खोल्या फक्त पाहुण्यांसाठी बुक करण्यात आल्या आहेत. या लग्नाला क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लग्नातील मेजवानीही तितकीच खास असणार आहे. पहाडी जेवणासोबतच नाश्त्यामध्ये इडली-डोसा आणि छोले-भटूरे अशा पदार्थांची रेलचेल असेल. 14 मार्चला मसुरीमध्ये लग्न उरकल्यानंतर 17 मार्चला लखनौमध्ये ग्रँड रिसेप्शन पार्टी होणार आहे. लग्नाचे विधी 13 मार्चपासूनच सुरू होतील. ऑस्ट्रेलियात नोकरी करणारी वंशिका आता कुलदीपची 'लाईफ पार्टनर' बनून नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com