जाहिरात

Cricket News: 'बुमराहला स्लोअर बॉल टाकायला मी शिकवलं' पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाच्या दाव्याने खळबळ

या दाव्यामुळे क्रिकेट वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Cricket News: 'बुमराहला स्लोअर बॉल टाकायला मी शिकवलं' पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाच्या दाव्याने खळबळ
  • जसप्रीत बुमराहला स्लोअर बॉल आपण शिकल्याचा दावा युएईच्या वेगवान गोलंदाज जहूर खानने केला आहे
  • जहूर खानने २०१९ च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या नेट बॉलर म्हणून काम करताना बुमराहला खास ग्रीप शिकवली होती
  • जहूरने सांगितले की, बुमराहने त्याच्या नवीन स्लोअर बॉल तंत्रज्ञानाचा सराव करून फलंदाजांना गोंधळवून सोडले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

भारतीय वेगवान गोलंदाजीचा कणा म्हणून जसप्रीत बुमराहकडे पाहिले जाते. त्याचा यॉर्कर असो की त्याचा 'स्लोअर बॉल' असो त्याचे जगभरात चाहते आहेत. त्याची गोलंदाजीची कला इतर बॉलर्स पेक्षा फारच वेगळी आणि अचूक आहे. त्याने जगभर आपल्या बॉलिंगचा दबदबा निर्माण केला आहे. त्याच्या गोलंदाजी पुढे जगातील भलेभले बॅट्समन गडबडतात. त्याचा 'स्लोअर बॉल' तर त्याचं मुख्य अस्त्र बनलं आहे.  मात्र, बुमराहने ही कला माझ्याकडून शिकली, असा खळबळजनक दावा युएईचा वेगवान गोलंदाज जहूर खान याने केला आहे. 2019 च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर म्हणून काम करताना बुमराहला ही खास ग्रीप शिकवल्याचा दावा जहूरने एका मुलाखतीत केला आहे. जहूर हा मुळचा पाकिस्तानी आहे. 

जहूर खानच्या म्हणण्यानुसार, युएईमधील 50 डिग्री तापमानात जेव्हा चेंडू ओला होतो, तेव्हा तो पकडणे कठीण जाते. एका सराव सत्रादरम्यान रोहित शर्मा आणि झहीर खान यांच्या उपस्थितीत बुमराहने जहूरला त्याच्या वेगळ्या ग्रीपबद्दल विचारले होते. जहूरने दावा केला की, बुमराहने त्याच्या गोलंदाजीची शैली पाहून आश्चर्य व्यक्त केले. नंतर स्वतः ही नवी पद्धत आत्मसात केली. जहूरच्या या दाव्यामुळे क्रिकेट वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. सध्या क्रिकेट वर्तूळात जहूरची ही मुलाखत चर्चेचा विषय ठरली आहे. 

नक्की वाचा - Cricket News: टीम इंडियाचा टी-20 कॅप्टन बदलणार! सूर्याच्या जागी 'हे' 3 खेळाडू शर्यतीत, BCCI चा नवा प्लॅन

जहूर खानने सांगितले की, त्याने टी-10 लीगमध्ये एक मेडन ओव्हर टाकली होती. ज्याची चर्चा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात होती. सराव करताना शेन बॉन्ड आणि महेला जयवर्धने यांनीही जहूरच्या ग्रीपचे कौतुक केले होते. "बुमराह इतका मोठा स्टार असूनही त्याने मला माझी ग्रीप विचारली आणि दोन-तीन दिवस सराव केल्यानंतर त्याने ती आत्मसात केली," असा जहूरचा ठाम दावा आहे. मात्र, बुमराह किंवा मुंबई इंडियन्सकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

नक्की वाचा - EXCLUSIVE: वर्ल्ड कप विजयानंतर माती कपाळाला का लावली? पहिल्याच मुलाखतीत सूर्याने उलगडले रहस्य

36 वर्षीय जहूर खानच्या मते, बुमराह आधी स्लोअर बॉल टाकायचा. पण त्याची ॲक्शन सामान्य होती. जहूरने त्याला एकाच आर्म स्पीडमध्ये चेंडूची गती कमी करण्याची नवी पद्धत शिकवली, ज्यामुळे फलंदाज चकवा खातात असं ही तो म्हणाला आहे. जहूरने आठवण करून दिली की, जेव्हा त्याने ही कला दाखवली तेव्हा बुमराहने महेला जयवर्धनेला बोलावून सांगितले की, "बघा, ही क्रिकेटमधील एक नवी गोष्ट आहे." बुमराहसारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजाने एका नेट बॉलरकडून शिकण्याची तयारी दाखवली, हे त्याचे मोठेपण असल्याचे जहूरने म्हटले. युएईच्या कडाक्याच्या उन्हात आणि दव असलेल्या रात्री चेंडूवर नियंत्रण कसे मिळवायचे, याचे धडे या काळात दिले गेल्याचे त्याने स्पष्ट केले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com