Albie Morkel vs Morne Morkel: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 वर्ल्डकप 2026 चा सुपर 8 चा दुसरा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. एकीकडे भारत आणि आफ्रिका संघात रंगतदार लढत होणार आहे. तर दुसरीकडे दोन सख्खे भाऊही एकमेकांच्या विरोधात रणनीती आखताना दिसणार आहे. या सामन्यात दोन भाऊ मोर्ने मोर्केल आणि एल्बी मोर्केल आमनेसामने उतरणार आहे. मोर्ने मोर्केल भारतीय क्रिकेट संघाचे गोंलादाजी प्रशिक्षक आहेत. तर एल्बी मोर्केल दक्षिण आफ्रिका संघासाठी स्पेशलिस्ट कंसल्टेंट म्हणून काम पाहत आहेत.
जेव्हा भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरतील. तेव्हा डग आऊट मध्ये दोन सख्खे भाऊ आपापल्या टीमसाठी रणनीती आखतील. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका आणि भारत सामन्यापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोन्ही भाऊ आपापल्या टीमबाबत चर्चा करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
मोर्ने मोर्केल
मोर्ने मोर्केल यांनी त्यांच्या टेस्ट करिअरमध्ये 86 सामने,117 वनडे आणि 44 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन खेळले आहेत. मोर्ने मोर्केलने आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकूण 544 धावा केल्या आहेत. मोर्ने मोर्केल गोलंदाजी प्रशिक्षक आहेत आणि गौतम गंभीर यांच्या कोचिंग स्टाफचा महत्त्वाचा भाग आहेत. या सामन्यात ते दक्षिण आफ्रिकेचा पराभव करण्यासाठी वेगळ्या रणनीतीसोबत तयार असल्याचं पाहायला मिळतील.