जाहिरात

Asia Cup मध्ये 4 वेळा झिरोवर आऊट, पण T-20 मध्ये बनला नंबर वन ऑलराऊंडर, 'त्या' खेळाडूनं पंड्यालाही मागे टाकलं!

Asia Cup मध्ये 4 वेळा झिरोवर आऊट, पण T-20 मध्ये बनला नंबर वन ऑलराऊंडर, 'त्या' खेळाडूनं पंड्यालाही मागे टाकलं!
T20 ICC Ranking 2025
मुंबई:

Saim Ayub Breaks Hardik Pandya Record : भारताने आशिया चषकाच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव केला. या विजयासह भारताने नवव्यांदा आशिया चषकाच्या ट्रॉफीवर जेतेपदाचं नाव कोरलं.पण एका खेळाडून या टूर्नामेंटमध्ये सुमार कामगिरी करूनही आयसीसी टी-20 च्या पुरुष ऑलराऊंडर्स रँकिंगमध्ये नंबर 1 चं स्थान गाठलं आहे. सॅम अयूब असं या पाकिस्तानी खेळाडूचं नाव आहे. ज्याने आशिया कप 2025 च्या टूर्नामेंटमध्ये चार वेळा शून्यावर आऊट होऊनही आयसीसीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. सैम अयूबची ही रॅकिंग पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे अयूब भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला पिछाडीवर टाकून पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. 

सर्वांनाच यामुळे आश्चर्य वाटलं आहे की, सैम आयुबने आशिया कपमध्ये खराब कामगिरी करूनही आयसीसीच्या रँकिंगमध्ये उडी घेतली आहे. आयसीसीच्या टी-20 फॉर्मेटमध्ये आयूब नवीन नंबर 1 अष्टपैलू खेळाडू बनला आहे. 23 वर्षीय सॅमने आतापर्यंत 241 रेटिंग पॉईंट्स मिळवले आहेत. जे हार्दिक पंड्यापेक्षा 8 पॉईंट्सने अधिक आहेत. सैमला फलंदाजीत गोलंदाजीपेक्षा मोठं यश मिळालं.

त्याने 7 सामन्यांमध्ये 6.40 इकोनॉमी रेटने 8 विकेट्स घेतल्या. पण त्याला फलंदाजीत धावांचा सूर गवसला नाही. सॅमने संपूर्ण टूर्नामेंटमध्ये फक्त 37 धावा केल्या.  सैम आशिया कपमध्ये चारवेळा शून्यावर डक आऊट झाला. यामध्ये भारता विरोधात एका सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. फायनलमध्ये त्याने 14 धावा केल्या, पण त्यानंतर पाकिस्तानचे सर्व फलंदाज स्वस्तात माघारी परतले. मागील दहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सॅमने एकदाच 20 धावांचा आकडा पार केला आहे. 

नक्की वाचा >> काय सांगता!धो धो पडणाऱ्या पावसाचा जोर मंदावणार,'या' तारखेपासून Monsoon घेणार निरोप

ICC टी-20 ऑलराऊंडर रँकिंग्स

1. सैम अयूब (पाकिस्तान)– 241 रेटिंग पॉइंट्स
2. हार्दिक पंड्या (भारत) – 233 रेटिंग पॉइंट्स
3. मोहम्मद नबी (अफगानिस्तान) – 231 रेटिंग पॉइंट्स
4. दीपेन्द्र सिंह ऐरी (नेपाळ)– 214 रेटिंग पॉइंट्स
5. सिकंदर रजा (झिम्बाब्वे)– 209 रेटिंग पॉइंट्स
6. वानिंदु हसरंगा (श्रीलंका) – 187 रेटिंग पॉइंट्स
7. रोस्टन चेज (वेस्टइंडीज)– 184 रेटिंग पॉइंट्स
8. लियाम लिविंगस्टोन (इंग्लंड) – 181 रेटिंग पॉइंट्स
9. मार्कस स्टॉयनिस (ऑस्ट्रेलिया) – 179 रेटिंग पॉईंट
10. अक्षर पटेल (भारत)– 175 रेटिंग पॉईंट्स

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com