जाहिरात

Viral Video: पायरीवरून उतरताना गर्लफ्रेंडचा चुकीचा अँगल शुट केला, हार्दिक पंड्या पापाराझींवर भडकला, म्हणाला...

हार्दिक पंड्या आणि त्याची रुमर गर्लफ्रेंड माहिका शर्माची सोशल मीडियावर मागील दिवसांपासून तुफान चर्चा रंगली आहे.अशातच मुंबईच्या एका रेस्टॉरंटमधून बाहेर निघताना माहिकाचा पापाराझींनी चुकीचा अँगल शुट केल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

Viral Video: पायरीवरून उतरताना गर्लफ्रेंडचा चुकीचा अँगल शुट केला, हार्दिक पंड्या पापाराझींवर भडकला, म्हणाला...
Hardik Pandya On Mahieka Sharma Viral Video
मुंबई:

Mahieka Sharma Video Viral : हार्दिक पंड्या आणि त्याची रुमर गर्लफ्रेंड माहिका शर्माची सोशल मीडियावर मागील दिवसांपासून तुफान चर्चा रंगली आहे.अशातच मुंबईच्या एका रेस्टॉरंटमधून बाहेर निघताना माहिकाचा पापाराझींनी चुकीचा अँगल शुट केल्याचा आरोप पंड्याने केला आहे. माहिका रेस्टॉरंटच्या पायऱ्यांवरून खाली उतरत असताना पापाराझींनी तिला चुकीच्या पद्धतीनं कॅमेरात कैद केलं. माहिकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हार्दिक पंड्या पापाराझींवर प्रचंड भडकला आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत पंड्याने पापाराझींचा चांगलाच समाचार घेतला आहे.

हार्दिकने माध्यमांना जबाबदारीने काम करून मर्यादा पाळण्याचं आवाहन केले आहे. हार्दिकने इंस्टा स्टोरीच्या माध्यमातून पापराझींना फटकारले आहे. हार्दिक पंड्याने पोस्टमध्ये म्हटलंय, हे हेडलाईन किंवा कोणत्या क्लिकबद्दल नाही,तर हा मूलभूत आदराचा मुद्दा आहे.स्त्रियांचा सन्मान राखला पाहिजे. प्रत्येकाने मर्यादा ठरवायला हव्यात. मी माध्यमकर्मींचा आदर करतो, जे दररोज खूप मेहनत घेतात. त्यांना मी सहकार्यही करतो. पण तुम्हाला सर्वांना विनंती आहे की, प्रत्येक गोष्ट कॅप्चर करण्याची गरज नाही.

प्रत्येक अँगलमधून फोटो घेण्याची गरज नाही. मर्यांदाचं भानही ठेवलं पाहिजे. हार्दिक पंड्याने मंगळवारी मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून परतणाऱ्या त्याच्या कथित गर्लफ्रेंडबाबचा चुकीचा अँगल शुट केल्याने पापाराझींना फटकारले आहे. पापाराझींच्या वागणुकीबद्दल पंड्याने नाराजी व्यक्त केली आहे. फोटोग्राफर्स आणि कॅमेरामॅनने हद्दल पार केल्याबद्दल हार्दिकने त्यांना चांगलंच सुनावलं आहे. 

नक्की वाचा >> Goa Fire : 25 लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार? क्लब मालक 'या' देशात फरार, मुंबईचं काय आहे कनेक्शन?

कोण आहे माहिका शर्मा? पाहा व्हायरल व्हिडीओ

माहिका शर्मा दिल्लीची रहिवासी आहे. तिने मॉडेलिंगच्या जगात नावलौकीक मिळवलं आहे. माहिकाकडे इकॉनॉमिक्स आणि फायनान्समध्ये पदवी आहे. ती मॉडेल म्हणून काम करते.

नक्की वाचा >> Raigad News : रायगडचा 'बादशाहा' कोण? बैलगाडा शर्यतीत कोणी मारली बाजी? 'या' बैलांची होतेय सर्वत्र चर्चा

माहिका हार्दिक पंड्यापेक्षा आठ वर्षांनी लहान 

आपल्याला सांगू इच्छितो की माहिका हार्दिक पांड्यापेक्षा सुमारे आठ वर्षांनी लहान आहे. पांड्याचा जन्म ८ ऑक्टोबर १९९३ रोजी गुजरातमधील चोर्यासी येथे झाला होता. सध्या तो ३२ वर्षांचा आहे. तर माहिकाचे वय २४ वर्षे आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com