Pakistan Team Player Viral Video : आयसीसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 चा थरार सुरु होण्यासाठी आता फक्त काही दिवस उरले आहेत. या सर्वात मोठ्या टूर्नामेंटमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संघांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. परंतु, ही स्पर्धा सुरु होण्याआधीच पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी फिट नसल्याची माहिती समोर आलीय. आफ्रिदीच्या खांद्यावर पाकिस्तानच्या संघाची सर्वात मोठी जबाबदारी असते. आयसीसीच्या टूर्नामेंटमध्ये आफ्रिदी भेदक मारा करून भल्या भल्या फलंदाजांची विकेट घेण्यात माहिर आहे. परंतु, आफ्रिदी फिट नसल्याने तो आगामी टी-20 वर्ल्डकप खेळण्याची शक्यता धूसर झाली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
25 वर्षीय शाहीन आफ्रिदी सध्या बिग बॅश लीगमध्ये खेळत आहे,जिथे तो ब्रिस्बेन हीट संघाचा खेळाडू आहे. या स्पर्धेचा एक सामना शनिवारी (27 डिसेंबर 2025) ब्रिस्बेन हीट आणि अॅडलेड स्ट्रायकर्स यांच्यात गाबा मैदानावर खेळला गेला.या सामन्यात शाहीन आफ्रिदी मैदानावर जखमी झाल्याचं पाहायला मिळालं.
एडिलेड स्ट्रायकर्सविरुद्ध शाहीनचा उडवला धुव्वा
या सामन्यादरम्यान शाहीन एडिलेड स्ट्रायकर्सविरुद्ध खूपच महागडा गोलंदाज ठरला.त्याने एका षटकात 19 धावा देण्याची सुमार कामगिरी केली. या संपूर्ण सामन्यात त्याने एकूण 3 षटके टाकली. त्याने 8.66 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या. परंतु, त्याला एकही विकेट घेता आली नाही.
नक्की वाचा >> खोपोलीच्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणात रायगड पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, कोणा कोणाला केली अटक?
फील्डिंगदरम्यान शाहीन झाला जखमी
स्ट्रायकर्सच्या फलंदाजीदरम्यान फील्डिंग करताना शाहीन आफ्रिदी जखमी झाला. ब्रिस्बेनच्या 14 व्या षटकात जेमी ओव्हर्टनच्या एका चेंडूवर जेव्हियर बार्टलेटने मोठा फटका मारला.त्याचदरम्यान मिड-ऑनवर असलेल्या शाहीनने चेंडू पकडण्याचा पूर्ण प्रयत्न केला,पण त्या तो चेंडू सीमारेषेच्या आत थांबवता आला नाही आणि त्यावेळी मैदानात तो जखमी झाला. असह्य वेदना झाल्याने शाहीन मैदान सोडून बाहेर गेला.