जाहिरात

Mumbai News: 'दूध पिताय की पांढरं विष?', मुंबईच्या 'या' भागात धक्कादायक प्रकार, व्हायरल व्हिडीओनं चिंता वाढवली

अंधेरी पश्चिम येथील कपासवाडी परिसरात भेसळयुक्त दूध विकणाऱ्या माफियांचा पर्दाफाश झाला आहे.या संतापजनक प्रकाराचा व्हिडीओ समोर आलाय.

Mumbai News: 'दूध पिताय की पांढरं विष?', मुंबईच्या 'या' भागात धक्कादायक प्रकार, व्हायरल व्हिडीओनं चिंता वाढवली
Mumbai Milk Adulteration Video Viral
मुंबई:

Mumbai Milk Adulteration Viral Video : देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या अंधेरीत एका धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंधेरी पश्चिम येथील कपासवाडी परिसरात भेसळयुक्त दूध विकणाऱ्या माफियांचा पर्दाफाश झाला आहे.या संतापजनक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मुंबईत भेसळयुक्त दूध म्हणजेच पांढर विषच विक्री केलं जात आहे, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. दूध माफियांनी लहान मुले, महिलांसह अबालवृद्धांच्या जीवाचा खेळच सुरु केल्याचं या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. या व्हायरल व्हिडीओची प्रशासनाने तातडीनं दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही जोर धरत आहे. 

कसं तयार होतं भेसळयुक्त दूध? 

दूध माफिया पैशांच्या लोभापोटी दुधामध्ये दुधामध्ये अत्यंत घातक पदार्थांचे मिश्रण करतात आणि लोकांचं आरोग्य धोक्यात टाकतात. डिटर्जंट पावडर आणि साबणाचे द्रावण,युरिया, सिंथेटिक केमिकल्स, रिफाईंड तेल एक लिटर शुद्ध दुधात मिक्स करू टाकतात. तसच दुधात पाणी मिसळून त्याचं प्रमाणही वाढवतात.हेच भेसळयुक्त दूध हजारो नागरिकांच्या घरी पोहोचतं. या भेसळयुक्त दुधाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्याने अनेकांना धक्काच बसला आहे. 

नक्की वाचा >> "काका तुझ्या मुलीच्या वयाची आहे मी" शो मध्ये संतापजनक प्रकार, प्रसिद्ध डान्सर भडकली, "मर्यादेत राहा.." Video

@_gautam_waghmare_नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्या माफियांचा पर्दाफाश झाला आहे. नामांकित कंपन्यांचे दूध सेंटरवरून थेट ग्राहकांना पाठवले जात नाही. हे दूध सर्वात आधी माफियांच्या अड्ड्यांवर नेलं जातं. त्यानंतर दुधाच्या पिशवीत घातक पदार्थ मिक्स केले जातात. त्यानंतर पुन्हा मशीनच्या मदतीने नव्या पिशव्या सील करून त्यांची विक्री केली जाते. 

नक्की वाचा >> Raigad News मंगेश काळोखे हत्याप्रकरणी मोठा ट्वीस्ट, तो व्हिडीओ आला समोर, आमदार महेंद्र थोरवेंचं खळबळजनक विधान!

इथे पाहा दूध माफियांचा व्हायरल व्हिडीओ

भेसळयुक्त दुधामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. किडनी आणि लिव्हर निकामी होण्याची शक्यताही असते.तसच मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढही खुंटते. कपासवाडीतील या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.या गंभीर प्रकाराबाबत अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com