मेहबुब जमादार, प्रतिनिधी
Raigad Mangesh Kalokhe Murder Case Latest Update : रायगडच्या खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. खोपोलीच्या शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची 26 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर रायगड पोलिसांनी या हत्याप्रकरणाचा तपास वेगाने फिरवला होता. काल शनिवारी या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला होता. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी 9 आरोपींना अटक केली आहे. तर इतर 3 आरोपींवर अजूनही कारवाई करण्यात आली नाही, अशी माहिती आहे.
पोलिसांनी या 9 आरोपींना ठोकल्या बेड्या
या प्रकरणाचा तपास रायगड पोलिसांच्या पाच पथकांकडून केला जात असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे, अशी माहिती आहे. रविंद्र परशुराम देवकर,दर्शन रविंद्र देवकर,धनेश रविंद्र देवकर,उर्मीला रविंद्र देवकर,विशाल सुभाष देशमुख,महेश शिवाजी धायतडक,सागर राजु मोरे, सचिन दयानंद खराडे, दिलीप हरिभाऊ पवार (उर्मिला देवकर यांचा भाऊ), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
नक्की वाचा >> Raigad News मंगेश काळोखे हत्याप्रकरणी मोठा ट्वीस्ट, तो व्हिडीओ आला समोर, आमदार महेंद्र थोरवेंचं खळबळजनक विधान!
याबाबत सविस्तर वृत्त असं की, मुंबई एअरपोर्ट,नवी मुंबई,खोपोली-खालापूर परिसर,तसेच रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी तपास पथक तैनात केले होते. रायगडच्या जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल,अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे,पोलीस अधिकारी विशाल नेहूल,तसेच तपास पथकातील इतर अधिकाऱ्यांनी तपासाची सुत्रे वागने फिरवली. पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करत आरोपींचा शोध घेतला. आरोपींना मदत करणाऱ्या इतर आरोपींचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांच्यावर काय कारवाई झाली?याबाबतची अधिकृत माहिती पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेली नाही.
नक्की वाचा >> Mumbai News: 'दूध पिताय की पांढरं विष?', मुंबईच्या 'या' भागात धक्कादायक प्रकार, व्हायरल व्हिडीओनं चिंता वाढवली
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world