- मोहम्मद इरफान खान नियाजी वाहतुकीचे नियम मोडूनही सेलिब्रिटी असल्यामुळे पोलीसांनी त्याच्यावर कारवाई केली नाही
- ट्रॅफिक पोलिसांनी त्याला अडवले असता इरफानने आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेटर म्हणून ओळख सांगितली
- पोलीस अधिकाऱ्याने दंड न आकारता इरफानशी क्रिकेट विषयक गप्पा मारल्या आणि पीएसएलमधील अनुभवांची देवाणघेवाण झाली
मैदानावर आपल्या खेळाने ओळख निर्माण करणाऱ्या खेळाडूंनी सामाजिक जबाबदारीचे भान राखणे अपेक्षित असते. मात्र, पाकिस्तानचा युवा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद इरफान खान नियाजी सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. वाहतुकीचे नियम मोडूनही केवळ 'सेलिब्रिटी' असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी पोलीस अधिकारी चक्क त्याचे गुणगान गाताना दिसले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय क्रिकेटपटूवर ही टीकेची झोड उठली आहे. शिवाय पोलीसच असे कसे वागू शकतात अशा ही कमेंट त्यावर येत आहेत.
नेमकी घटना काय?
व्हायरल व्हिडिओमध्ये इरफान खान नियाजी आणि त्याचा मित्र कारच्या पुढच्या सीटवर विना सीट बेल्ट बसलेले दिसत आहेत. ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना अडवून नियमाबद्दल विचारणा केली असता, इरफानने आपली ओळख सांगत रुबाब दाखवण्यास सुरुवात केली. तो एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटर असल्याचे समजताच पोलीस अधिकाऱ्याचा सूर पूर्णपणे बदलला. दंड आकारण्याऐवजी तो अधिकारी इरफानशी क्रिकेटवर गप्पा मारू लागला. यावेळी इरफानने त्याला पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधील काही किस्सेही सांगितले.
पीएसएलमध्ये उपविजेत्या संघाचा भाग
इरफान खान नुकत्याच पार पडलेल्या पीएसएलमध्ये 'हैदराबाद किंग्समेन' संघाकडून खेळला होता. या स्पर्धेचा अंतिम सामना 3 मे रोजी लाहौर येथे हैदराबाद किंग्समेन आणि पेशावर जाल्मी यांच्यात झाला होता. पेशावरने हा सामना जिंकून जेतेपदावर नाव कोरले, तर इरफानच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
वैयक्तिक कामगिरीत अपयश
अंतिम सामन्यात इरफानकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो सपशेल अपयशी ठरला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इरफानला मायकल ब्रेसवेलने केवळ 1 धावेवर धावबाद (Run Out) केले. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत 9 वनडे आणि 14 टी-२० सामने खेळले आहेत.
Pakistan cricketer Irfan Khan Niazi was stopped by a traffic warden for not wearing a seat belt, where the two later shared a light-hearted conversation about cricket. #TOKSports #IrfanKhanNiazi pic.twitter.com/DGn7HcCniK
— TOK Sports (@TOKSports021) May 9, 2026
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world