T-20 WC : टीम इंडियाचे 'सर जाडेजा' आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्त

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस येथे अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात करत विजयाला गवसणी घातली. तब्बल १७ वर्षांनी टी-२० वर्ल्डकप भारतात परत आला आहे. परंतु हा विजयोत्सव सुरु असताना कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. या धक्क्यातून भारतीय चाहते सावरतात न सावरतात तोच रविंद्र जाडेजानेही टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

हे ही वाचा - T-20 WC BLOG : रोहित नावाचं इमोशन

टी-२० विश्वचषकात रविंद्र जाडेजाला आपला फारसा प्रभाव पाडता आला नाही. अंतिम सामन्यातही जाडेजा अवघ्या २ धावा काढून बाद झाला. गोलंदाजीतही जाडेजाला फार कमी विकेट मिळाल्या. परंतु मोक्याच्या क्षणी भारतीय संघाकरता फिल्डींगच्या माध्यमातून जाडेजाने मोलाचं योगदान दिलं. प्रदीर्घ काळापासून भारतीय संघाचा हिस्सा असलेल्या रविंद्र जाडेजाने अखेरीस निवृत्ती स्विकारणं पसंत केलं आहे.

कशी राहिली आहे रविंद्र जाडेजाची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधली कारकिर्द?

फलंदाजीत रविंद्र जाडेजाने ७४ सामन्यांत ५१५ धावा केल्या आहेत. २१.४५ च्या सरासरीने जाडेजाने मधल्या फळीत आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवली आहे ज्यात नाबाद ४६ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.

हे ही वाचा - Rohit Sharma Retirement: विराटनंतर कॅप्टन रोहित शर्माची T20 इंटरनॅशनलमधून निवृत्तीची घोषणा

गोलंदाजीत जाडेजाने ७४ सामन्यांत ५४ विकेट घेतल्या आहेत. १५ धावांत ३ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.

अवश्य वाचा - Virat Kohli Retirement: T20 विजेतेपदानंतर विराट कोहली भावुक, निवृत्त होताना दिला खास संदेश