Rohit Sharma Retirement: विराट कोहलीपाठोपाठ टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माही टी20 इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. भारतानं टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विजेतेपद पटकावलं. या विजेतेपदाबरोबरच विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारताच्या दोन 'ऑल टाईम ग्रेट' क्रिकेटपटूंनी या प्रकारातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहितनं यापुढे वन-डे आणि टेस्ट क्रिकेट खेळत राहणार असल्याचं जाहीर केलं आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रोहितनं फायनलनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्याचा निर्णय जाहीर केला. 'हा माझा देखील शेवटचा (T20 इंटरनॅशनल) सामना होता. या प्रकाराला निरोप देण्याचा यापेक्षा अधिक चांगला क्षण नाही. मी भारतीय टीममधील माझी कारकिर्द याच प्रकारातून सुरु केली.विश्वकप जिंकणे हे माझं ध्येय होतं. मला या भावना शब्दात मांडणं अवघड आहे. हा माझ्यासाठी प्रचंड भावुक प्रसंग आहे. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये विजेतेपद पटकावयचं होतं. आम्ही ते मिळवू शकलो, याचा मला आनंद आहे,' असं रोहितनं सांगितलं.
ट्रेंडींग बातमी - Virat Kohli Retirement: T20 विजेतेपदानंतर विराट कोहली भावुक, निवृत्त होताना दिला खास संदेश
रोहित शर्माची T20 कारकिर्द
रोहित शर्मानं 159 T20 इंटरनॅशनलमध्ये 4231 रन केले आहेत. या प्रकारात सर्वाधिक 5 सेंच्युरी झळकावण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. रोहित दोन वेळा टी20 वर्ल्ड कप जिंकणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे. तो 2007 मधील टी20 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य होता. त्यानंतर 17 वर्षांनी 2024 साली त्यानं कॅप्टन म्हणून ही स्पर्धा जिंकली आहे.
Just two modern-day legends posing with the ICC Men's T20 World Cup Trophy 😊🏆#T20WorldCup | #TeamIndia | #SAvIND | @ImRo45 | @imVkohli pic.twitter.com/AGmPsR7pAK
— BCCI (@BCCI) June 29, 2024
रोहितनं या टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक रन केले. रोहितनं 8 सामन्यात 156.70 च्या स्ट्राईक रेटनं 257 रन केले. यामध्ये 3 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. या टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या बॅटर्सच्या यादीत रोहित दुसऱ्या क्रमांकावर राहिला. अफगाणिस्तानच्या रहमनउल्ला गुरबाजनंच फक्त रोहितपेक्षा जास्त 281 रन केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world