जाहिरात

BCCI President: 'त्या' अटीमुळे BCCIचा 'बॉस' बदलला! राजीव शुक्ला यांची कार्यकारी अध्यक्षपदी वर्णी

सध्या त्यांचे वय ७० वर्षे आणि ४१ दिवस आहे. अशा परिस्थितीत, नियमांनुसार ते अध्यक्षपदावर राहण्यास पात्र नव्हते.

BCCI President:  'त्या' अटीमुळे BCCIचा 'बॉस' बदलला! राजीव शुक्ला यांची कार्यकारी अध्यक्षपदी वर्णी

BCCI President Rajeev Shukla: क्रिकेटच्या वर्तुळातून मोठी बातमी येत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी राजीव शुक्ला यांना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. पुढील निवडणुकीपर्यंत बीसीसीआय अध्यक्षपदाची जबाबदारी राजीव शुक्ला यांच्याकडेच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार बुधवारी (२७ ऑगस्ट) एपेक्स कौन्सिलची बैठक झाली. येथे रॉजर बिन्नी नव्हे तर राजीव शुक्ला यांना अध्यक्ष म्हणून पाहिले गेले. या विशेष बैठकीचा मुख्य उद्देश ड्रीम११ चा करार रद्द करणे आणि पुढील प्रायोजकाची शक्यता यावर चर्चा करणे होता.

Prithvi Shaw: पृथ्वी शॉ सोबतची ती तरुणी कोण? सोशल मीडियावर फोटोची जोरदार चर्चा

नियम काय आहे?

बीसीसीआयच्या घटनेनुसार, अध्यक्षपद धारण करणाऱ्या अधिकाऱ्याला वयाच्या ७० व्या वर्षापर्यंत पद सोडावे लागते. रॉजर बिन्नी यांचा जन्म १९ जुलै १९५५ रोजी कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे झाला. सध्या त्यांचे वय ७० वर्षे आणि ४१ दिवस आहे. अशा परिस्थितीत, नियमांनुसार ते अध्यक्षपदावर राहण्यास पात्र नव्हते.

रॉजर बिन्नी यांच्या जाण्यानंतर, राजीव शुक्ला आता सुमारे सहा महिन्यांसाठी अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळतील. ६५ वर्षीय शुक्ला २०२० पासून बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. १८ ऑक्टोबर २०२२ रोजी रॉजर बिन्नी यांनी ३६ वे बीसीसीआय अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यांच्यापूर्वी माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी हे पद भूषवले होते. अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली.

Mohammed Shami : 'माझ्या निवृत्तीने कुणाचे भले होत असेल तर...' सर्व चर्चांवर मोहम्मद शमीचा मोठा खुलासा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com