RCB vs GT Match Result : आयपीएल 2026 चा हंगाम सुरु झाल्यापासून काही खेळाडूंनी विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.आज बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स आणि रॉय चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगतदार सामना झाला. परंतु, या सामन्यात गुजरातचा स्टार फलंदाज साई सुदर्शनने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं.साईने होमग्राऊंडवर दमदार शतक ठोकून ख्रिस गेलचा सुपर रेकॉर्ड मोडला. साईची इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वात वेगवान दोन हजार धावा पूर्ण केल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, आज चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात आरसीबीचा सलामीवीर फलंदाज विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडला. 18.5 ओव्हरमध्ये बंगळुरूने 206 धावा करत सामना जिंकला. गुजरातवर बंगळुरूने पाच विकेट आणि सात चेंडू राखत विजय मिळवला.
याआधी वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर या विक्रमाची नोंद होती.पण आता साईने या विक्रमाला गवसणी घातली आहे.
गुजरात टायटन्स संघासाठी सलामीवीर साई सुदर्शनने 58 चेंडूत 100 धावांची शतकी खेळी केली. यामध्ये 11 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश आहे.कर्णधार शुबमन गिलने 24 चेंडूत 32 धावा केल्या.तर जॉस बटलरने 16 चेंडूत 25 धावांची खेळी केली. तर विशिंग्टन सुंदर 19 आणि जेसन होल्डर 23 धावांवर नाबाद राहिला.
साई सुदर्शन पुढे, गेलला टाकलं मागे
| इनिंग | 2000 धावा |
| 47 | साई सुदर्शन |
| 48 | ख्रिस गेल |
| 52 | शॉन मार्श |
| 57 | ऋतुराज गायकवाड |
चेंडूनुसार सर्वात वेगवान 2000 धावा
| चेंडू | फलंदाज |
| 1193 | अभिषेक शर्मा |
| 1211 | वीरेंद्र सहवाग |
| 1306 | ऋषभ पंत |
| 1326 | यशस्वी जैस्वाल |
| 1353 | यूसुफ पठाण |
| 1361 | साई सुदर्शन |
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world