
सध्या भारत आणि पाकिस्तानचे संबंध निश्चितच तणावपूर्ण आहेत. परंतु पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यापूर्वी दोन्ही देशांचे संबंध सामान्य होते. एक काळ असा होता जेव्हा भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू आपापसात विनोद करत असत. त्याच काळात घडलेल्या एका घटनेची आठवण करून देत वीरेंद्र सेहवागने एक अतिशय रंजक किस्सा सांगितली आहे. भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंसाठी एक डिनर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळचा हा किस्सा असल्याचं सेहवागने सांगितलं.
या डिनरसाठी सर्व खेळाडू एकत्र आले होते. प्रत्येकाचे खाणे पिणे सुरू होते. त्यावेळी शोएब अख्तरने कदाचित दोन-चार पेग जास्त घेतले होते असं सेहवाग सांगतो. त्यानंतर तो सचिन तेंडुलकरला उचलण्याचा प्रयत्न करू लागला. सचिन तेंडुलकरला उचलणे सोपे काम नव्हते. उचलताना तो पडला. मी बाजूला उभा होतो. शोएब पडल्यानंतर मी हसलो असं सेहवागने सांगितलं. पण त्याला घाबरवण्यासाठी म्हटले, 'आता तर तुझे करिअर संपले. तू आमच्या सर्वात मोठ्या खेळाडूला पाडलं आहेस. त्याला दुखापत झाली आहे. यावरून शोएब अख्तर टेन्शनमध्ये आला होता.
( नक्की वाचा : IND vs ENG: लॉर्ड्स टेस्टमध्ये इतिहास घडणार! 4 भारतीय खेळाडूंची महारेकॉर्डवर नजर )
सचिन तेंडुलकर खाली पडल्यामुळे तो आता बीसीसीआयला याची तक्रार करेल असं ही मी शोएबला सांगितलं. शिवाय ही तक्रार बीसीसीआय प्रमाणे पीसीबीला ही करणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे तू तर संपलास. तू तर मेलास, तुझे करिअर तर संपले. असं सेहवागने शोएबला सांगितलं. या डिनरनंतर हे सर्व दोन तीन दिवस चाललं. नंतर शोएबने सचिन तेंडुलकरचे पाय धरले आणि म्हणाला, 'भाई, तुम्ही असे काही करू नका. माझे करिअर संपून जाईल. असा भन्नाट किस्सा विरेंद्र सेहवागने सांगितला.
( नक्की वाचा : Brian Lara Record: मुल्डरला जमलं नाही आता हे 2 जण मोडू शकतात लाराचा 400 रन्सचा रेकॉर्ड, भविष्यवाणीनं खळबळ )
सध्या हे तिन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग सामन्यांदरम्यान कॉमेंट्री करताना दिसतो. तर शोएब अख्तर आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून खेळावर आपले विचार मांडताना दिसतो. सचिन मात्र फार खास प्रसंगांवरच सर्वां समोर येतो. क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानचा इतिहास खूपच जबरदस्त राहीला आहे. क्रिकेटप्रेमींना या दोन्ही देशांमधील सामन्याची नेहमीच प्रतीक्षा असते. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये तर त्यांच्यातील सामन्याचा रोमांच शिगेला पोहोचतो. लवकरच ते आशिया चषकामध्ये पुन्हा एकदा आमनेसामने येऊ शकतात अशी अपेक्षा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world