जाहिरात

SRH vs CSK: हैदराबादने चेन्नईला धुळ चारली, 10 धावांनी केला पराभव

चेन्नईकडून अंशुल कंबोज आणि जेमी ओवरर्टन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तर मुकेश चौधरीने 2 बळी टिपले.

SRH vs CSK: हैदराबादने चेन्नईला धुळ चारली, 10 धावांनी केला पराभव
सौजन्य IPL

Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings: IPL 2026 च्या 27 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यावर धडाकेबाज सुरूवात केली.  हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अभिषेक शर्मा आणि हेन्रिच क्लासेन यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 9 गडी गमावून 194 धावा उभारल्या. चेन्नई सुपर किंग्सला (CSK) विजयासाठी 195 धावांचे आव्हान दिले होते. या आवाहानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवात चांगली झाली नाही. संजू सॅमसन अवघ्या सात धावा काढून बाद झाला. त्याने आक्रमक सुरूवात करत सिक्स लगावला. पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. 

त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि आयुश म्हात्रे या मराठमोठ्या फलंदाजांनी चेन्नईची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.  आयुश म्हात्रेने जबरदस्त खेळी करत अवघ्या 13 चेंडूत 30 धावा चोपून काढल्या. त्यात एक सिक्स आणि पाच चौकरांचा समावेश होता. त्याला नितीश कुमार रेड्डीने बाद केले. त्या पाठोपाठ ऋतुराज गायकवाड ही बाद झाला. या सामन्यात ही त्याला मोठी धावसंख्या उभारण्यास अपयश आले. त्याला 13 चेंडूत 19 धावाच करता आल्या.  सर्फराज खानने चांगली सुरूवात केली. पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. त्याला 25 धावा करता आल्या. ब्रेविसकडून अपेक्षा होती. पण तो शुन्यावर बाद झाला. त्यानंतर शेवटी शिवम दुबेने चेन्नईच्या विजयासाठी प्रयत्न केले. पण ते अपूर्ण राहीले. चेन्नईला 20 ओव्हर्समध्ये 184 धावा करता आल्या. त्यांचे 8 फलंदाज बाद  झाले. हैदराबादने चेन्नईवर दहा धावांनी विजय मिळवला.

नक्की वाचा - VIDEO: कॅच ऑफ द सीझन! श्रेयस अय्यरचा अफलातून झेल, रोहित-सूर्या स्तब्ध; एक्सप्रेशन कॅमेऱ्यात कैद

टॉस गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या हैदराबादला अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी स्फोटक सुरुवात करून दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी केवळ 5.5 ओव्हरमध्ये 75 धावांची भागीदारी केली. अभिषेकने अवघ्या 15 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण करत स्टेडियम दणाणून सोडले. त्याने 22 चेंडूंत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 59 धावा कुटल्या. कॅप्टन इशान किशन मात्र पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मधल्या फळीत पडझड सुरू असताना हेन्रिच क्लासेनने एका बाजूने किल्ला लढवला. क्लासेनने 39 चेंडूंत 59 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ज्यात 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. हैदराबादच्या अन्य फलंदाजांना चांगला खेळ करता आला नाही. ते स्वस्त्यात तंबूत परतले.  

नक्की वाचा - Vinod Kambli: अरे बापरे! विनोद कांबळीला 'हे' काय झालं? सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज क्रिकेटर्सनं...

एकवेळ हैदराबाद मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत असताना मुकेश चौधरीने चेन्नईला यश मिळवून दिले. त्याने लागोपाठच्या चेंडूंवर ट्रॅव्हिस हेड (24) आणि कर्णधार ईशान किशन (0) यांना बाद करून हैदराबादला मोठे धक्के दिले. त्यानंतर जेमी ओवरर्टनने स्थिरावलेल्या अभिषेक शर्माला बाद करून हैदराबादची धावगती रोखली. शेवटच्या षटकांमध्ये अंशुल कंबोजने टिच्चून गोलंदाजी करत हैदराबादच्या तळाच्या फलंदाजांना फार काळ टिकू दिले नाही. चेन्नईकडून अंशुल कंबोज आणि जेमी ओवरर्टन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तर मुकेश चौधरीने 2 बळी टिपले.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com