जाहिरात

IPL 2026 SRH vs KKR : हैदराबादने ईडन गार्डनमध्ये फोडला विजयाचा नारळ, कोलकाता संघाला 165 धावांवर गुंडाळलं

आयपीएल 2026 चा सहावा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात इडन गार्डनवर रंगला. हैदराबादचा या सामन्यात 65 धावांनी विजय झाला. 

IPL 2026 SRH vs KKR : हैदराबादने ईडन गार्डनमध्ये फोडला विजयाचा नारळ, कोलकाता संघाला 165 धावांवर गुंडाळलं
SRH vs KKR Match Update Today

SRH vs KKR Match Update : आयपीएल 2026 चा सहावा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात इडन गार्डनवर रंगला. केकेआरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या हैदराबाद संघाने कोलकाताच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत 20 षटकांमध्ये 8 विकेट्स गमावून 226 धावांपर्यंत मजल मारली.हेन्रिक क्लासेनने 35 चेंडूत सर्वाधिक 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर या धावांचं टार्गेट गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाताच्या संघाने 16 षटकांत सर्वबाद 161 धावा केल्या. त्यामुळे हैदराबादचा या सामन्यात 65 धावांनी विजय झाला. 

हैदराबादच्या फलंदाजांनी पाडला धावांचा पाऊस 

सनरायजर्स हैदराबादच्या संघासाठी सलामीचे फलंदाज ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्माने दमदार फलंदाजी केली. ट्रेव्हिसने 21 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकार ठोकून 46 धावा कुटल्या. तर अभिषेकने 21 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकार ठोकून 48 धावांची खेळी केली. तसच नितीश कुमार रेड्डीनेही 24 चेंडूत 39 धावांची खेळी साकारली.कोलकात्या ब्लेसिंग मुझारबानी या गोलंदाजाने 4 विकेट्स घेण्याची जबरदस्त कामगिरी केली. तर वैभव अरोराने 2,कार्तिक त्यागी आणि अनुकूल रॉयने प्रत्येकी एक विकेट घेतली. हैदराबादसाठी जयदेव उनाडकटने 3,हर्ष दुबेनं 1,तर इशान मलिंगा आणि नितिश कुमार रेड्डीने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

नक्की वाचा >> Nashik News : नाशिकच्या 'या' भागात मोठं ट्रॅफिक जॅम, मुंबईहून धुळ्याकडे जाणारी हजारो वाहने अडकली, कारण काय?

कोलकाता संघासाठी सलामीला उतरलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणेनं 10 चेंडूत फक्त 10 धावा केल्या. तर फिन एलनने 7 चेंडूत 28 धावांची वादळी खेळी खेळी. यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले. तर विकेटकीपर रघुवंशी या सामन्यातही अप्रतिम फलंदाजी करून 29 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये 2 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश आहे. कॅमरून ग्रीन फक्त 2 धावा करून  बाद झाला. तर अनुकूल रॉयला भोपळाही फोडता आला नाही.

नक्की वाचा >> Pune News : पुण्यात 'या' भागातील पोलीस भरती दरम्यान भयंकर प्रकार, 9 उमेदवारांमुळे पोलिसांची झोपच उडाली
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com