T-20 WC : कांगारुंच्या शेपटावर 'हिटमॅन'चा पाय, टी-20 क्रिकेटमध्ये केला अनोखा विक्रम

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

वेस्ट इंडिज येथे सुरु असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा रुद्रावतार प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. परंतु यानंतर रोहित शर्माने एकहाती किल्ला लढवत कांगारुंच्या शेपटावर पाय ठेवला.

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चौफेर धुलाई करताना रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण करत अनेक विक्रम प्रस्थापित केले. ज्यात सर्वात महत्वाचा विक्रम म्हणजे रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये २०० षटकारांचा टप्पा पूर्ण केला. महत्वाची बाब म्हणजे या निकषात एकही खेळाडू सध्याच्या घडीला रोहितच्या जवळपासही नाहीये. यादी तुम्हीच पाहा...

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज -
१) रोहित शर्मा - २०० षटकार

२) मार्टीन गप्टील - १७३ षटकार
३) जोस बटलर - १३७ षटकार
४) निकोलस पूरन - १३२ षटकार
५) ग्लेन मॅक्सवेल - १३० षटकार


याचसोबत टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीतही रोहित तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. १९ चेंडूत रोहितने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

Advertisement

टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारे भारतीय फलंदाज -

१) युवराज सिंग - विरुद्ध इंग्लंड (१२ बॉल)
२) लोकेश राहुल - विरुद्ध स्कॉटलंड (१८ बॉल)
३) रोहित शर्मा - विरुद्ध ऑस्ट्रेलिया (१९ बॉल)
४) युवराज सिंग - विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२० बॉल)
५) सूर्यकुमार यादव - विरुद्ध झिम्बाब्वे (२३ बॉल)

विराट कोहली भोपळाही न फोडता बाद झाल्यानंतर रोहितने ऋषभ पंतच्या साथीने ८७ धावांची भागीदारी केली. स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर पंत बाद झाल्यानंतरही रोहितने सूर्यकुमारच्या साथीने आपली फटकेबाजी सुरु ठेवत भारताला शतकी धावसंख्येचा टप्पा पूर्ण करुन दिला. रोहित आपलं शतक पूर्ण करणार असं वाटत असतानाच मिचेल स्टार्कने रोहितला माघारी धाडलं. ४१ बॉलमध्ये रोहितने ७ चौकार आणि ८ षटकारांसह ९२ धावा केल्या.

Advertisement

हे ही वाचा - झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शुबमन गिल कॅप्टन; मराठमोळा तुषार देशपांडेही भारतीय संघात