
Team India Jersey sponsorship: भारतातील सर्वात मोठी फॅन्टसी गेमिंग कंपनी असलेल्या ड्रीम 11 ने ऑनलाइन गेमिंगसंदर्भात बनलेल्या नवीन कायद्यामुळे भारतीय संघाच्या जर्सी स्पॉन्सरशिपमधून माघार घेतली आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघ 9 सप्टेंबरपासून आशिया चषक स्पर्धेत खेळताना दिसेल. तर महिला संघाला पुढील महिन्यात आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळायचे आहे. यामुळे, बीसीसीआय लवकरात लवकर नवीन स्पॉन्सर शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
बीसीसीआयने अद्याप ड्रीम 11 सोबत करार तुटल्याची अधिकृत माहिती दिली नाही. पण लवकरच याबद्दल जाहिरात प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. ड्रीम 11 बाहेर पडल्यामुळे आता टीम इंडियाच्या जर्सीवर कोणत्या कंपनीचे नाव दिसेल, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. एनडीटीव्हीला बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे की, तीन कंपन्यांनी या प्रकरणात रुची दाखवली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितले की, ड्रीम 11 बाहेर पडल्यानंतर तीन मोठ्या कंपन्यांनी जर्सी स्पॉन्सरसाठी रुची दाखवली आहे. मात्र, टेंडर प्रक्रिया सुरू झाल्यावर ही स्पर्धा आणखी रोमांचक होईल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर, बीसीसीआयला या वेळी अधिक पैसे मिळण्याची अपेक्षा आहे. बोर्ड नवीन प्रायोजकासोबत 3 वर्षांचा करार करण्याचा विचार करत आहे.
यापूर्वी शनिवारी 23 ऑगस्टला एनडीटीव्हीने सांगितले होते की, ड्रीम-11 च्या अधिकाऱ्यांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. ड्रीम-11 ने बोर्डाला कळवले आहे की ते यापुढे स्पॉन्सरशिप सुरू ठेवू शकणार नाहीत. जर बीसीसीआय 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकाआधी नवीन स्पॉन्सर मिळवू शकली नाही, तर भारतीय संघ प्रमुख स्पॉन्सर शिवायच (lead sponsor) स्पर्धेत खेळेल.
Online Gaming Bill 2025: Dream11, MPL सह सर्वच 'पेड गेम्स' बंद, तुमच्या पैशांचं काय होणार?
सूत्रांनी हे देखील उघड केले आहे की आशिया चषकासाठी भारतीय संघाची जर्सी, ज्यात ड्रीम 11 चे नाव छापलेले आहे, ती आधीच तयार झाली असली तरी तिचा वापर या स्पर्धेसाठी केला जाणार नाही. याआधी शुक्रवारी बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले होते की, बोर्ड देशाच्या कायद्यांचे पालन करेल. सैकिया म्हणाले, "जर याला परवानगी नसेल तर आम्ही काहीही करणार नाही. केंद्र सरकारने बनवलेल्या प्रत्येक नियमाचे बीसीसीआय पालन करेल."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world