Vaibhav Sooryavanshi Post Viral: मॅनचेस्टरमध्ये भारत आणि इंग्लंड टीमदरम्यान मालिकेतील दुसरा टी20 सामना खेळवला जाईल. या सामन्यापूर्वी वैभव सूर्यवंशीने एक खास पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण वैभवने स्वतःचा एक फोटो इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर करत 'New Chapter' असे कॅप्शन लिहिले आहे, ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही स्टोरी म्हणजे त्याच्या इंटरनॅशनल क्रिकेटमधील पदार्पणाचे संकेत आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. सोशल मीडियावर वैभवच्या डेब्यूबाबत सातत्याने चर्चा केली जात आहे.
(नक्की वाचा: Vaibhav Sooryavanshi: "त्याने पँट काढून...", वैभवला संघात जागा न मिळाल्याने रवी शास्त्री संतापले, म्हणाले...)
'New Chapter' पोस्टमुळे वाढली धाकधूक
वैभवच्या या पोस्टबाबत चाहते वेगवेगळ्या चर्चा करत आहेत. हे त्याच्या डेब्यूचे संकेत आहेत का? याबाबत लोक आपापले मत मांडत आहेत. विशेष म्हणजे आयर्लंड दौऱ्यावर वैभवला खेळण्याची संधी मिळाली नव्हती, ज्यामुळे चाहते आणि माजी दिग्गज खेळाडू प्रचंड नाराज झाले होते. अगदी सुनील गावस्कर यांनाही समजू शकलेले नाही की, अखेर वैभवला आयर्लंड दौऱ्यात संधी का देण्यात आली नाही? इतकेच नव्हे तर आयर्लंड दौरा हे एक असे व्यासपीठ होते जिथे वैभवला संधी मिळायला हवी होती, असे रवी शास्त्री यांनीही मान्य केले आहे.

Photo Credit: vaibhav sooryavanshi instagram
कपिल देवही हैराण
भारताचे महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांचे असे म्हणणंय की, "स्टार बॅटर वैभव सूर्यवंशीमध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंट आहेआणि या बाबतीत तो सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यासारख्या खेळाडूंच्या कॅटरीमध्ये दिसतो. टीम इंडियामध्ये निवड करताना वैभवचे वय नाही, तर त्याच्या क्षमतेला आणि टॅलेंटला प्राधान्य दिले पाहिजे."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world