
India Vs Australia 2nd ODI Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील दुसऱ्या वन-डे (ODI) सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याला पुन्हा एकदा भोपळा फोडता आला नाही. अॅडलेड येथे सुरू असलेल्या या सामन्यात कोहलीने अवघ्या ४ चेंडूंचा सामना केला आणि तो शून्य (Duck) धावांवर बाद झाला. विशेष म्हणजे, या मालिकेतील पर्थ येथे झालेल्या पहिल्या वन-डेमध्येही तो ८ चेंडू खेळून शून्यावरच बाद झाला होता.
आपल्या ३०४ वन-डे सामन्यांच्या (304 ODI Career) कारकिर्दीत विराट कोहलीसोबत अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे, जेव्हा त्याला सलग दोन वन-डे सामन्यांमध्ये शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले आहे. पर्थ येथील पहिल्या सामन्यात त्याला अनुभवी मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) बाद केले होते आणि कूपर कोनोलीने त्याचा झेल पकडत उपस्थित ९० टक्के भारतीय प्रेक्षकांना शांत केले होते.
"मी सचिनपेक्षा जास्त धावा करु शकलो असतो", ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज खेळाडूचा दावा
अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात, ऑस्ट्रेलियाच्या २६ वर्षीय लोकल बॉय झेवियर बार्टलेटने (Xavier Bartlett) त्याला यष्ट्यांसमोर (LBW) अडकवले. विराट कोहलीला ऑस्ट्रेलियातील मैदानं नेहमीच 'रास' आली आहेत. अॅडलेडमध्ये तर त्याच्या बॅटने पाण्यासारख्या धावा केल्या आहेत. अॅडलेड ओव्हलवर त्याने १३ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ६०.९३ च्या सरासरीने ५ शतकांसह ९७५ धावा केल्या आहेत. या मैदानावर ४ वन-डे सामन्यांत त्याने ६१ च्या सरासरीने २ शतकांसह २४४ धावा केल्या आहेत. पण, या ऐतिहासिक मैदानावर आंतरराष्ट्रीय सामन्यात शून्यावर बाद होण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे.
विराट कोहली जेव्हा एलबीडब्ल्यू (LBW) होऊन मैदानाबाहेर येत होता, तेव्हा त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. मात्र, अॅडलेड ओव्हल स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी त्याच्या 'कदा'चा (Statue) आदर करत त्याला सन्मान दिला. कोहलीनेही मैदान सोडण्यापूर्वी त्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार करत आपली कृतज्ञता व्यक्त केली. मालिका वाचवण्यासाठी भारताला अॅडलेड वन-डे जिंकणे अत्यंत आवश्यक असताना, विराट कोहलीचा सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद होणे संघाला खूप महागात पडू शकते.
VIRAT KOHLI GONE FOR HIS SECOND DUCK OF THE SERIES!#AUSvIND | #PlayoftheDay | @BKTtires pic.twitter.com/jqIdvMeX9T
— cricket.com.au (@cricketcomau) October 23, 2025
विराट आणि रोहित (Rohit Sharma) यांच्यासाठी 'उलटगणती' सुरू झाली असल्याचे आधीच मानले जात आहे. या मालिकेपूर्वी विराटने ' “जेव्हा तुम्ही हार मानता, तेव्हाच तुम्ही अपयशी ठरता.” (You fail only when you give up) असे ट्वीट केले होते. आता हे अपयश नाही, तर 'अंत'ची सुरुवात आहे का, असा सवाल क्रिकेट प्रेमींकडून विचारला जात आहे.
नक्की वाचा- Mohammad Rizwan: रिझवानला पॅलेस्टाईन समर्थन भोवले? धार्मिक कट्टरतेमुळे कॅप्टन्सी गेली; कोचवर थेट आरोप, Video)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world