Michael Hussey: ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू मायकल हसीने भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरबद्दल एक मोठे विधान केले आहे. हसीने दावा केला आहे की, जर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त काळ खेळायला मिळाले असते, तर त्याने तेंडुलकरपेक्षा 5000 धावा अधिक केल्या असत्या.
मायकल हसीने 28 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आपल्या कारकिर्दीत 324 डावांमध्ये 22 शतके आणि 72 अर्धशतकांसह एकूण 12,398 धावा केल्या. तो ऑस्ट्रेलियाच्या महान फलंदाजांपैकी एक मानला जातो. आंतरराष्ट्रीय पदार्पणापूर्वी, त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये 273 सामन्यांत 61 शतकांसह जवळपास 23,000 धावा केल्या होत्या.
(नक्की वाचा- 'सरनेममुळे सर्फराज खान बाहेर...?',इंडिया-A टीममध्ये निवड का झाली नाही?,शम्मा मोहम्मद यांनी गंभीरला सुनावलं!)
"मला लवकर संधी मिळाली नाही"
'द ग्रेड क्रिकेटर'यू-ट्यूब चॅनलवर बोलताना मायकल हसीने उशिरा झालेल्या पदार्पणाबद्दल खंत व्यक्त केली. त्याने म्हटलं की, "माझ्या काळात ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खूप प्रतिभा होती, त्यामुळे मला पदार्पण करायला खूप वेळ लागला. जर मला आधी पदार्पण करण्याची संधी मिळाली असती, तर मी निश्चितपणे तेंडुलकरपेक्षा जास्त धावा करू शकलो असतो."
हसी पुढे म्हणाला, "मी याबद्दल खूप विचार केला आहे. मला वाटते होते की, मी कदाचित क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सचिन तेंडुलकरपेक्षा 5000 धावांनी मागे राहीन. सर्वात जास्त शतके, सर्वात जास्त विजय, सर्वात जास्त ॲशेस विजय आणि सर्वात जास्त विश्वचषक विजय, कदाचित हे सर्वच. आणि मग दुर्दैवाने, सकाळी उठतो तेव्हा ते एक स्वप्न असल्याचे जाणवते. मला लवकर संधी मिळाली असती, तर चांगले झाले असते. पण माझ्यासाठी चांगली गोष्ट ही होती की जेव्हा माझी निवड झाली, तेव्हा माझ्या खेळाची मला चांगली समज होती."
(नक्की वाचा- Mohammad Rizwan: रिझवानला पॅलेस्टाईन समर्थन भोवले? धार्मिक कट्टरतेमुळे कॅप्टन्सी गेली; कोचवर थेट आरोप, Video)
तेंडुलकरच्या विक्रमाजवळ पोहोचले नाही
मायकल हसीने सातत्याने चांगली कामगिरी करूनही सचिन तेंडुलकरपेक्षा 78 शतकांनी मागे राहिला. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके केली आहेत आणि सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 34,357 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, हसीने तेंडुलकरपेक्षा जवळपास 450 डाव कमी खेळले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world