
Mohammad Rizwan: पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये पुन्हा एकदा मोठा उलथापालथ झाली आहे. विकेट किपर - बॅटर मोहम्मद रिझवान याला वन-डे (ODI) टीमच्या कर्णधारपदावरून अचानक हटवण्यात आले आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याची नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय आश्चर्यकारक मानला जात आहे, कारण रिझवानला मागील वर्षी ऑक्टोबरमध्येच बाबर आझमच्या राजीनाम्यानंतर ही जबाबदारी मिळाली होती. विशेष म्हणजे, शाहीन आफ्रिदीलाही नुकतेच T20I कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते.
रिझवानच्या हकालपट्टीमागे पॅलेस्टाईन समर्थन आणि धार्मिक 'संस्कृती'?
रिझवानच्या हकालपट्टीमुळे पाकिस्तानच्या क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली असताना, संघाचा माजी खेळाडू राशिद लतीफ याने या निर्णयासाठी व्हाईट बॉल टीमचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांना जबाबदार धरले आहे. इतकेच नाही, तर रिझवानने गाझा-इस्रायल संघर्षावर पॅलेस्टाईनला जाहीरपणे पाठिंबा दिल्यामुळे हेसनने त्याला हटवण्याचा निर्णय घेतला असावा, असे लतीफचे मत आहे.
एका सोशल मीडिया व्हिडिओमध्ये लतीफ यांनी थेट आरोप केला आहे. तो म्हणाले, "केवळ त्याने पॅलेस्टाईनचा झेंडा उचलला म्हणून तुम्ही त्याला कर्णधारपदावरून काढून टाकाल का? एका इस्लामिक देशात गैर-इस्लामिक कर्णधार असावा, अशी ही मानसिकता आली आहे." लतीफ यांनी या निर्णयामागे माईक हेसन यांचा हात असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.
( नक्की वाचा : Smriti Mandhana Marriage: स्मृती मंधाना लग्न कधी करणार? बॉयफ्रेंड पलाशनं दिलं थेट उत्तर )
"हेसनला ड्रेसिंग रूममधील ही 'संस्कृती' आवडत नसावी. त्याला ही संस्कृती संपवायची आहे. इंझमाम-उल-हक, सईद अन्वर किंवा सकलेन मुश्ताक आमच्या संघात असताना आम्हाला या गोष्टींची कधीच पर्वा नव्हती," असेही तो पुढे म्हणाला.
कर्णधार म्हणून रिझवानने ड्रेसिंग रूममध्ये काही धार्मिक पद्धती आणल्या, ज्या माईक हेसन यांना मान्य नव्हत्या, असा दावाही लतीफनं या व्हिडिओमध्ये केला आहे.
According to former Pakistan Captain Rashid Latif said Rizwan was removed from captaincy because he spoke for people of palestine and brought religious practices in the team which hesson didnt liked.#ShaheenAfridi #PakistanCricket #CricketTwitter pic.twitter.com/8CMCn2CIjN
— Mustafa (@mustafamasood0) October 20, 2025
रिझवानची पॅलेस्टाईन समर्थनाची भूमिका
मोहम्मद रिझवान याने यापूर्वीही पॅलेस्टाईनबद्दल आपली सहानुभूती आणि समर्थन जाहीर केले आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात, रिझवानने त्याच्या PSL फ्रँचायझी मुल्तान सुलतान्स मार्फत प्रत्येक षटकार आणि विकेटसाठी पॅलेस्टाईनच्या धर्मादाय संस्थांना 100,000 रुपये मदत देण्याची घोषणा केली होती.
त्यापूर्वी 2023 मध्ये झालेल्या वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानच्या विजयानंतर रिझवानने तो विजय "गाझातील बंधू-भगिनींना" समर्पित केला होता.
पीसीबीचा निर्णय आणि अंतर्गत चर्चा
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने रिझवानच्या हकालपट्टीचे कोणतेही अधिकृत कारण दिलेले नाही आणि आपल्या निवेदनात त्याचा थेट उल्लेखही केलेला नाही. निवड समिती आणि पांढऱ्या चेंडूच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांच्यात इस्लामाबाद येथे झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
आफ्रिदीच्या नियुक्तीचा निर्णय झाला, तेव्हा रिझवानची हकालपट्टी जवळजवळ निश्चित मानली जात होती. कारण, आठवड्याच्या अखेरीस PCB ने एक निवेदन जारी केले होते, ज्यात त्याला ODI कर्णधार म्हणून कायम ठेवण्यास स्पष्ट नकार दिला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझवानला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय केवळ हेसन यांच्यामुळे नसून, PCB च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्याला पाठिंबा दिला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world