जाहिरात

Virat Kohli: रोहितनंतर विराट कोहलीही कसोटी क्रिकेटला रामराम ठोकणार, BCCIला निर्णय कळवला!

Virat Kohli News: विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे क्रीडा विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

Virat Kohli: रोहितनंतर विराट कोहलीही कसोटी क्रिकेटला रामराम ठोकणार, BCCIला निर्णय कळवला!

Virat Kohli News:  दोन दिवसांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आपल्या चाहत्यांसह क्रीडाप्रेमींना मोठा धक्का दिला. रोहित शर्माने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपण कसोटी क्रिकेटला रामराम ठोकत असल्याचे सांगितले. त्यानंतर आता क्रिडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली असून विराट कोहलीही कसोटी क्रिकेटला रामराम ठोकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'द इंडियन एक्सप्रेस'मधील एका वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रनमशीन विराट कोहलीही आपल्या चाहत्यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे क्रीडा विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

महत्त्वाचं म्हणजे विराट कोहलीने आपला हा निर्णयही बीसीसीआयला कळवला असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. विराटच्या या निर्णयानंतर बीसीसीआयच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना या मुद्द्यावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. कारण टीम इंडियाला लवकरच इंग्लंडचा एक अतिशय महत्त्वाचा दौरा करायचा आहे.

नक्की वाचा : IPL 2025: कधी आणि केंव्हा होणार उर्वरित सामने? वाचा सर्व अपडेट )

टीम इंडियाला पुढील महिन्यात इंग्लंडचा दौरा करायचा आहे. जिथे पाच सामन्यांची महत्त्वाची कसोटी मालिका खेळवली जाईल. आगामी मालिकेपूर्वी, नियमित कर्णधार रोहित शर्माने कसोटी स्वरूपाला अलविदा म्हटले आहे. अशा परिस्थितीत जर विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला तर भारतीय संघाला इंग्लडसारख्या बलाढ्य संघाशी सामना करणे कठीण होईल. 

विराट कोहलीची कसोटी कारकीर्द
विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने देशासाठी 123 कसोटी सामने खेळले आहेत. विराटने 210 डावांमध्ये 46. 85च्या सरासरीने 9230 धावा केल्या आहेत. कोहलीच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 7 द्विशतके, 30 शतके आणि 31 अर्धशतके आहेत.

( नक्की वाचा : Rohit Sharma : एक कॅप्टन... रोहितच्या निवृत्तीवर गौतम गंभीरच्या पोस्टची फॅन्समध्ये चर्चा )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com