जाहिरात

IPL 2025: कधी आणि केंव्हा होणार उर्वरित सामने? वाचा सर्व अपडेट

IPL 2025: कधी आणि केंव्हा होणार उर्वरित सामने? वाचा सर्व अपडेट
मुंबई:

IPL 2025 New Schedule After Suspension: भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएलचा सध्या सुरु असलेला सिझन स्थगित करण्यात आला आहे. बीसीसीआयनं शुक्रवारी सकाळी (9 मे) रोजी हा निर्णय जाहीर केला. यापूर्वी गुरुवारी धरमशालामध्ये सुरु असलेला पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) हा सामना अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे रद्द करण्यात आला होता. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक पुढील 10 दिवसांमध्ये होणार आहे. सर्व विदेशी खेळाडू आता आपल्या देशामध्ये परतत आहेत. आयपीएलचे उर्वरित सामने ऑगस्ट महिन्यात होण्याची शक्यता आहे. आयपीएलमधील 74 पैकी 57 सामने पूर्ण झाले असून उर्वरित 17 सामने अद्याप बाकी आहेत.  

( नक्की वाचा : Rohit Sharma : एक कॅप्टन... रोहितच्या निवृत्तीवर गौतम गंभीरच्या पोस्टची फॅन्समध्ये चर्चा )
 

बीसीसीआयनं काय म्हंटलं होतं?

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) यापूर्वी आयपीएल 2025 मधील उर्वरित सामने एक आठवड्यांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. संबंधिकत अधिकारी आणि सर्व व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर तसंच परिस्थितीचा व्यापक विचार केल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केलं जाईलस असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं होतं. 

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने सर्व प्रमुख भागधारकांशी योग्य सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.बीसीसीआयला देशाच्या सशस्त्र दलांच्या सामर्थ्यावर आणि सज्जतेवर पूर्ण विश्वास आहे, बोर्डाने सर्व भागधारकांच्या सामूहिक हितासाठी हा निर्णय घेतला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com