Virat Kohli World Record Most ODI Century vs NZ in 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंदौरच्या होळकर स्टेडियममध्ये रंगलेल्या तिसऱ्या आणि आणि निर्णायक एकदिवसीय (ODI)सामन्यात विराट कोहलीने इतिहास रचला. या सामन्यात शतकी खेळी करून विराट न्यूझीलंडविरुद्ध वनडे इतिहासात सर्वाधिक शतके करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. पण त्याची ही ऐतिहासिक शतकी खेळी भारताला विजय मिळवून देऊ शकली नाही. विराट 108 चेंडूत 124 धावा करून बाद झाला. दरम्यान, न्यूझीलंडने भारताचा पराभव करत ही मालिका 2-1 ने जिंकली.
विराट कोहलीने केला वर्ल्ड रेकॉर्ड
न्यूझीलंडने भारताला 338 धावांचं आव्हान दिलं होतं. या टार्गेटचा पाठलाग करताना विराट कोहलीने अप्रतिम फलंदाजी केली. विराटने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील 85वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. विराटने 108 चेंडूत 124 धावांची उत्कृष्ट खेळी साकारली,ज्यात 10 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. या शतकासह विराटने न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये 7 शतके पूर्ण केली आहेत. त्यांनी भारताचे वीरेंद्र सेहवाग आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांच्या 6-6 शतकांच्या विक्रमाला मागे टाकत नवीन कीर्तिमान रचला आहे.
नक्की वाचा >> CM Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दावोसमध्ये सांगितला मुंबईच्या विकासाचा प्लॅन, "आपली मुंबई.."
वीरेंद्र सेहवाग आणि पॉन्टिंगच्या नावावर होता हा खास रेकॉर्ड
वीरेंद्र सेहवागने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत न्यूझीलंडविरुद्ध 23 सामन्यांच्या 23 डावांत एकूण 1157 धावा केल्या होत्या. 130 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. त्याने 52.59 सरासरीने आणि 103.95 स्ट्राईक रेटने या धावांपर्यंत मजल मारली. यात 6 शतके आणि 3 अर्धशतके यांचा समावेश होता.तसच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पॉन्टिंगने 51 सामन्यांच्या 50 डावांत 1971 धावा केल्या. 141 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या होती. त्याने 45.83 च्या सरासरीने आणि 81.71 च्या स्ट्राईक रेटने इतक्या धाव्या केल्या. पॉन्टिंगच्या नावावरही 6 शतके आणि 12 अर्धशतके नोंदवली गेली होती.
नक्की वाचा >> Ulhansnagar News : वंचितचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल, उल्हासनगर महापालिकेत फासा पलटणार, 'या' पक्षाच्या संपर्कात
न्यूझीलंडविरुद्धच्या या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत कोहलीने उत्कृष्ट फलंदाजी केली. पहिल्या सामन्यात त्याने 93 धावांची अप्रतिम खेळी केली. फक्त 7 धावांमुळे त्याचं शतक हुकलं दुसऱ्या सामन्यात कोहलीने 23 धावाच केल्या. पण आज झालेल्या शेवटच्या वनडे सामन्यात कोहलीने धडाकेबाज खेळी करून 124 धावांची शतकी खेळी रचली.मात्र विराटच्या शानदार शतकानंतरही भारतीय संघ 338 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 41 धावांनी मागे पडला. या विजयासह न्यूझीलंडने वनडे मालिका 2-1 ने खिशात घातली.