CM Devendra Fadnavis Speech Today : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड इकोनॉमिक फोरमसाठी 5 दिवसांच्या स्वित्झर्लंड दौऱ्यावर आहेत. फडणवीसांचे झ्युरिक येथे आगमन होताच त्यांचं मराठमोळ्या पद्धतीत स्वागत करण्यात आलं.पारंपरिक वेश,पारंपरिक पद्धती आणि पारंपारिक उत्साहात मराठी लोकांनी केलेल्या स्वागताबद्दल फडणवीस यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. स्वित्झर्लंडमधील भारताचे राजदूत मृदुलकुमार यांनीही फडणवीसांचं स्वागत केलं. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि किंजारापू राम मोहन नायडू यांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले."आता मुंबईच्या विकासाचे आणखी ठोस नियोजन आपण हाती घेतले असून पुढच्या 5वर्षात विकसित राष्ट्रांच्या राजधानींपेक्षा आपली मुंबई अधिक प्रगत असेल.कोणत्याही देशात जा,तेथे मराठी माणूस आज प्रगती करतो आहे.मेहनत आणि विश्वासार्ह हीच त्याची ओळख आहे",असं मोठं विधान फडणवीस यांनी केलं आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांचे आज दावोस येथे आगमन होताच मराठी भाषिक नागरिकांनी त्यांचे मराठमोळ्या पद्धतीने ओवाळून स्वागत केले. यावेळी जनतेला संबोधीत करताना ते म्हणाले, "राज्यात आपण महा-एनआरआय फोरम तयार केला असून,त्या माध्यमातून स्वदेश,स्वधर्म आणि स्वभाषेला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करीत आहोत.कोणत्याही प्रगतीचा मूलभूत विचार हा सांस्कृतिक वैभव जपण्याचा असतो.त्यातूनच भौतिक प्रगती साध्य होत असते.आता मुंबईच्या विकासाचे आणखी ठोस नियोजन आपण हाती घेतले असून पुढच्या 5 वर्षात विकसित राष्ट्रांच्या राजधानींपेक्षा आपली मुंबई अधिक प्रगत असेल.कोणत्याही देशात जा, तेथे मराठी माणूस आज प्रगती करतो आहे.मेहनती आणि विश्वासार्ह हीच त्याची ओळख आहे,असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
🇮🇳🇨🇭 CM Devendra Fadnavis accepted the World Economic Forum badge representing 'Magnetic Maharashtra' at Davos
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 18, 2026
🇮🇳🇨🇭 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा बॅज स्विकारत दावोस येथे 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'चे प्रतिनिधित्व करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सज्ज
18-1-2026 📍Zurich, Switzerland.… pic.twitter.com/VtkDYM9n6R
नक्की वाचा >> Ulhansnagar News : वंचितचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल, उल्हासनगर महापालिकेत फासा पलटणार, 'या' पक्षाच्या संपर्कात
इतरही नागरिकांनी या कार्यक्रमादरम्यान फडणवीसांची भेट घेतली. यावेळी प्रत्येक जण महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करत होता. एकूणच महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीची धूम तेथेही पाहायला मिळाली.बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून झालेल्या कार्यक्रमात 'स्वागत देवाभाऊ' असा फलकही लावण्यात आला होता. 'बृहन्महाराष्ट्र मंडळ,स्वित्झर्लंड'तर्फे आयोजित स्वागत समारंभात देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. तरराष्ट्रीय मराठी मंचाचे समन्वयक अमोल सावरकर यांनी आज झ्युरिक येथे मराठी मंचाने स्वित्झर्लंडमधील विविध शाळांमध्ये मराठी भाषेचा वर्ग सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले. फडणवीसांनी या उपक्रमाचं कौतुकही केलं.
नक्की वाचा >> Akola News अनाथांचा नाथ अन् जनतेची साथ, 800 अनोळखी मृतदेहांना खांदा दिला, अकोल्याच्या नगरसेवकाची सर्वत्र चर्चा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world