Virat Kohli Cryptic Post : टीम इंडिया बुधवारी (15 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली. टीम इंडियाचा स्टार बॅटर विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यानिमित्त बऱ्याच काळानंतर चाहत्यांना खेळताना दिसणार आहे. विराटचा खेळ पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचल्यानंतर विराट कोहलीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर क्रिप्टिक पोस्ट शेअर केलीय, जी सोशल मीडियावर व्हायरल होतेय. विराटच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय.
Virat Kohliने पोस्टमध्ये नेमके काय लिहिलंय?
रविवारी (19 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे होणाऱ्या वनडे सामन्यापूर्वी विराट कोहलीने सोशल मीडियावर केलेली पोस्टची चर्चा सर्वत्र आहे. "जेव्हा तुम्ही हार पत्करण्याचा निर्णय घेता, तेव्हाच तुम्ही खरोखर अपयशी ठरता." अशा आशयाची क्रिप्टिक पोस्ट सोशल मीडियावर त्याने शेअर केलीय.
(नक्की वाचा: Virat Kohli : विराट कोहलीचा RCB ला नकार! व्यावसायिक करार नाकारल्याने एक्झिटच्या चर्चांना उधाण)
विराट कोहलीची टेस्ट आणि टी20 इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती
बुधवारी (15 ऑक्टोबर) टीम इंडिया ऑस्ट्रेलियाकडे रवाना झाली. या टीममध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीलाही संधी देण्यात आलीय. दुसरीकडे कोहलीने टी 20 इंटरनॅशनल आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. यादरम्यान विराट कोहलीच्या या क्रिप्टिक पोस्टचे कित्येकअर्थ काढले जात आहेत. विशेष म्हणजे कोहलीचा वनडे क्रिकेटमधील रेकॉर्ड जबरदस्त आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून नवी सुरुवात?
ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सीरिज विराट कोहलीची अखेरची इंटरनॅशनल सीरिज असू शकते, अशी चर्चा सुरू आहे. पण दुसरीकडे अशीही शक्यता वर्तवली जातेय की, कोहलीच्या क्रिप्टिक पोस्टनुसार तो क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या सध्या मनःस्थितीत नाही. म्हणजे भविष्यातही तो क्रिकेट खेळताना दिसू शकतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये विराट कोहलीचे दमदार कमबॅक पाहायला मिळेल, अशी चाहत्यांनी अपेक्षा व्यक्त केलीय.