जाहिरात

Ind vs Pak : पाकड्यांचे धाबे दणाणणार, उस्मान तारिकचंही टेन्शन वाढणार, सूर्या करणार गोलंदाजी? पाहा व्हिडीओ

गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा ‘एक्स-फॅक्टर’ मानल्या जाणाऱ्या उस्मान तारिकच्या मिस्ट्रीला उलगडण्यासाठी एक मास्टर प्लान तयार केला आहे.

Ind vs Pak :  पाकड्यांचे धाबे दणाणणार, उस्मान तारिकचंही टेन्शन वाढणार, सूर्या करणार गोलंदाजी? पाहा व्हिडीओ
Ind vs Pak, Suryakumar Yadav Video

Team India Strategy vs Usman Tariq IND vs PAK T20 World Cup 2026:  कोलंबोच्या आर.प्रेमदासा स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्डकपचा महामुकाबला आज संध्याकाळी 7 वाजता रंगणार आहे.पाकड्यांना पराभवाची धूळ चारण्यासाठी भारताच्या खेळाडूंनी कंबर कसली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवही सज्ज झाला असून त्याच्या एका नव्या व्हिडीओनं क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तसच पाकिस्तानच्या खेळाडूंच्याही भुवया उंचावल्या आहेत.  गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा ‘एक्स-फॅक्टर' मानल्या जाणाऱ्या उस्मान तारिकच्या मिस्ट्रीला उलगडण्यासाठी एक मास्टर प्लान तयार केला आहे.

पाकिस्तानी स्पिनर उस्मान तारिक त्याच्या ‘पॉज-अँड-रिलीज'(थांबून चेंडू टाकण्याच्या) अॅक्शनसाठी चर्चेत आहेत. भारतीय फलंदाजांना या अनोख्या आणि विचित्र अॅक्शनमुळे अडचण येऊ नये,यासाठी कर्णधार सूर्याने स्वतः पुढाकार घेतला. सराव सत्रादरम्यान सूर्या अगदी उस्मान तारिकच्या शैलीत चेंडू टाकताना दिसला.

सूर्याने अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांच्यासह सर्व फलंदाजांना उस्मान तारिकच्या अॅक्शनची कॉपी करून त्यांना सरावासाठी मदत केली. मैदानावर तारिकच्या बॉलिंग अॅक्शनला पाहून भारतीय फलंदाज दचकू नयेत आणि त्यांचा ‘एक्स-फॅक्टर'पहिल्याच षटकात निष्प्रभ करून टाकायचा,अशी रणनिती गंभीर आणि सूर्याने आखली आहे.

नक्की वाचा >> IND vs PAK T20 WC 2026: भारत-पाकिस्तान महामुकाबला..लाईव्ह सामना फ्री मध्ये कुठे पाहाल? ICC ने दिलंय मोठं गिफ्ट

अभिषेक शर्मा ‘मिशन पाकिस्तान'साठी सज्ज

सूर्यकुमारने भारतीय चाहत्यांनी सर्वात मोठी खुशखबर दिली आहे.प्रेस कॉन्फरन्समध्ये सूर्याने स्पष्ट केले की, अभिषेक शर्मा आजच्या महामुकाबल्यासाठी पूर्णपणे फिट आहे.अभिषेकच्या पुनरागमनाने पाकिस्तानच्या गोटात खळबळ उडाली आहे.अभिषेक स्टार फलंदाज तर आहेच. पण त्याला या सामन्यात एक मोठी संधी सुद्धा आहे. युवराज सिंग (9 षटकार) आणि विराट कोहली (11 षटकार) यांनी पाकिस्तानविरुद्ध मारलेल्या सर्वाधिक षटकारांच्या विक्रमाला मागे टाकण्याची शर्माला संधीही आहे. विराटचा विक्रम मोडण्यासाठी अभिषेकला फक्त 5 षटकारांची गरज आहे.

पाकिस्तान या सामन्यात सलमान आगा आणि उस्मान तारिक या दोघांकडे महत्त्वाच्या भूमिकेत पाहत आहे. मात्र, भारतीय संघाने नेट सत्रात या दोन्ही खेळाडूंच्या शैलीचा विशेष अभ्यास करून त्यानुसार खास तयारी केली आहे.अशातच मैदानावर कोणाची रणनीती यशस्वी ठरते.पाकिस्तानचा ‘एक्स-फॅक्टर' की भारताची नियोजनबद्ध तयारी? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com