जाहिरात

Team India For WI : वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा!; हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत बाहेर

वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी 3 वनडे आणि 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वनडे संघात पंजाबचा ऑलराउंडर नमन धीर आणि जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी यांना पहिल्यांदाच स्थान मिळाले आहे.

Team India For WI : वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा!; हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत बाहेर

27 सप्टेंबरपासून तिरुवनंतपुरम येथून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वनडे आणि टी-20 संघांची घोषणा केली आहे. या निवडीमध्ये काही मोठे आणि धक्कादायक बदल पाहायला मिळत आहेत. वनडे संघाची धुरा शुभमन गिलकडे सोपवण्यात आली असून श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत केएल राहुल (KL Rahul) उपकर्णधार असणार आहे. तर टी-20 संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर कडे देण्यात आले आहे.

हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतला का वगळले?

हार्दिक पांड्या 20 सप्टेंबरपर्यंत तंदुरुस्त होणे अपेक्षित असले, तरी निवड समितीने स्पष्ट केले आहे की, इंडिया-ए कडून 10 षटके गोलंदाजी सिद्ध केल्याशिवाय त्याला मुख्य संघात स्थान दिले जाणार नाही. व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये अपेक्षित कामगिरी न करू शकल्यामुळे व्यवस्थापनाच्या फीडबॅकनंतर पंतला वगळण्यात आले आहे. मात्र, त्याला 'रेस्ट ऑफ इंडिया' इराणी कप संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.

नितीश कुमार रेड्डीला संधी 

हार्दिकच्या अनुपस्थितीत नितीश कुमार रेड्डीला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघातून काढून थेट वनडे संघात मुख्य ऑलराउंडर म्हणून संधी देण्यात आली आहे.

रवींद्र जडेजाचे पुनरागमन अन् नवे चेहरे

अक्षर पटेल आशियाई क्रीडा स्पर्धेत व्यस्त असल्याने 37 वर्षीय अनुभवी रवींद्र जडेजाला वनडे संघात पुन्हा संधी मिळाली आहे. याशिवाय पंजाबचा युवा ऑलराउंडर नमन धीर आणि जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी यांना पहिल्यांदाच भारतीय वनडे संघात स्थान मिळाले आहे.

भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (उपकर्णधार/यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, आकिब नबी, यशस्वी जयस्वाल, नमन धीर.

भारतीय टी-20 संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), टिळक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयंक यादव.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com