Who Is Ridhima Pathak : भारत आणि बांग्लादेश यांच्यातील संबंध दिवसेंदिवस खराब होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. देशाची महिला निवेदिका रिद्धिमा पाठकने सोशल मीडियावर महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.तिने बांग्लादेश प्रीमियर लीगच्या आगामी सीझनमधून नाव मागे घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. रिद्धिमाने इन्स्टाग्राम स्टोरीत म्हटलंय की, "सत्य गोष्टींना महत्त्व असतं. मला बीपीएलमधून काढून टाकण्यात आले आहे,अशी माहिती पसरवली जात आहे. हे खरं नाही. आगमी सीजनमध्ये मी भाग घेणार नाही,असा निर्णय मी स्वत: घेतला आहे. माझ्यासाठी सर्वात आधी माझा देश आहे.मी क्रिकेट या खेळाला कोणत्याही असाइनमेंटपेक्षा जास्त महत्त्व देते".
रिद्धिमाने पुढं म्हटलंय की, "खूप वर्षे मला प्रामाणिकपणे, सन्मानाने या खेळाची सेवा करण्याचं भाग्य लाभलं आहे.हे कधीही बदलणार नाही.मी नेहमीच प्रामाणिकपणा,स्पष्टता आणि खेळाच्या बाजूने उभी राहीन. मला समर्थन करणाऱ्या आणि संपर्क करणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते.तुमचं प्रेम माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. क्रिकेटमध्ये सत्य गोष्टींना महत्त्व असतं. आता माझ्याकडून आणखी कोणतीही टीप्पणी नाही."
कोण आहे रिद्धिमा पाठक?
रिद्धिमा पाठकच्या या धाडसी निर्णयानंतर तिच्याबद्दल माहिती घेण्याची सर्वांची उत्सुकता वाढली आहे. सोशल मीडियावर अनेक यूजर्सने तिच्या प्रोफाईलबाबत विचारणा केलीय. अशातच रिद्धिमाच्या जीवनाशी संबंधीत अधिक माहिती जाणून घ्या.रिद्धिमा पाठकचा जन्म 17 फेब्रुवारी 1990 रोजी झारखंडची राजधानी रांची येथे झाला.सध्या तिचे वय 35 वर्षे आहे.पेशाने ती मॉडेल,अभिनेत्री,व्हॉइस आर्टिस्ट,टीव्ही प्रेझेंटर आणि स्पोर्ट्स अँकर आहे.
नक्की वाचा >> Video: "32-34 वर्षांची मुलं लठ्ठ, टक्कल..",डॉक्टर मुलीसाठी वर शोधणारी आई होतेय प्रचंड ट्रोल, "तुमची मुलगीही.."
रिद्धिमाने तिच्या करिअरची सुरुवात एका रेडिओ स्टेशनमध्ये इंटर्नशिपच्या माध्यमातून केली. त्यानंतर तिने आरजे (रेडिओ जॉकी)म्हणून काम केलं.तिने स्टार स्पोर्ट्स,टेन स्पोर्ट्स,सोनी आणि जिओ या चॅनेल्सवर अनेक स्पोर्ट्स इव्हेंट होस्ट आणि प्रेझेंट केले आहेत.सध्या ती स्पोर्ट्स नेटवर्क्ससोबत काम करत आहे.तिंच व्हॉइस मॉड्युलेशन,जबरदस्त अँकरिंग आणि खेळाविषयीच्या ज्ञानामुळे तिची मोठी फॅन फॉलोईंग आहे.
मुंबईच्या रामनिरंजन पोदार शाळेत पूर्ण केलं शिक्षण
रिद्धिमा पाठकने तिचं शालेय शिक्षण मुंबईच्या रामनिरंजन पोदार स्कूलमध्ये पूर्ण केलं.शालेय जीवनातही ती खूप सक्रीय होती.त्या काळात तिने वाद-विवाद (डिबेट) आणि नाट्यप्रयोगांमध्ये (थिएटर शो) भाग घेण्यास सुरुवात केली.
नक्की वाचा >> "त्यांचे शब्द चुकीच्या पद्धतीने...", रवींद्र चव्हाण-विलासराव प्रकरणावर CM फडणवीसांची सारवासारव, म्हणाले..
कलाक्षेत्राच्या विपुण असल्याने इंजिनिअरची नोकरी सोडली
2008 मध्ये रिद्धिमाने एमकेएसएसएस कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथून इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनीअरिंगमध्ये A ग्रेडसह पदवी पूर्ण केली.तिला या क्षेत्रात नोकरीही मिळाली. पण आर्ट्स आणि क्रिएटिव्ह फील्डकडे ओढ असल्याने तिने इंजिनिअरची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
कोहली,धोनीसारख्या मोठ्या स्टार्सची घेतली मुलाखत
35 वर्षीय रिद्धिमाने अत्यंत कमी वेळातच भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज विराट कोहली आणि एम.एस.धोनीची मुलाखत घेण्याचा मान मिळवला आहे.