CM Devendra Fadnavis Latur Speech : "विलासराव देशमुखांनी लातुरला एक वेगळी ओळख दिली. विलासराव देशमुख एक असं नाव आहे.जे पक्षाच्या पलीकडे आहे. या नेत्यांच्या आपण या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे म्हणून आपण ज्यांचा आदर करतो, त्यातील प्रमुख नाव विलासराव देशमुख यांचं आहे. हे सांगताना मला याठिकाणी कोणताही संकोच नाही.दोन दिवसापूर्वी याठिकाणी काही गोंधळ निर्माण झाला.आमचे अध्यक्ष (रवींद्र चव्हाण) याठिकाणी आले होते.त्यांना सांगायचं होतं की, राजकीय दृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचा आहे.पण कदाचित त्यांचे शब्द हे चुकीच्या पद्धतीने गेले असतील, त्याबद्दल त्यांनी दिलगीरीही व्यक्त केली आहे.पण मी जाहीरपणे सांगतो, काँग्रेस पक्षाशी आमची लढाई असली तरी, विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे.ते या महाराष्ट्रातील महत्तावाचे नेतृत्व आहेत", असं मोठं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरच्या प्रचारसभेत केलं.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
फडणवीस पुढे म्हणाले,"लातूर अशी भूमी जिने महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात नेतृत्व दिले. राजकारणात चाकुरकर सारखे लोकं विरळ आहेत.विलासराव देशमुख पक्षाच्या पलीकडचे नाव आहे.रविंद्र चव्हानांचे शब्द चुकीचे गेले त्यांनी दिलगीरी व्यक्त केली.विलासराव देशमुख आम्हाला आदरणीय आहेत. काँग्रेसची आमची लढाई असली तरी विलासरावांबद्दल नित्तांत आदर आहे".
नक्की वाचा >> KDMC Election कल्याण-डोंबिवली महायुतीतील बंडखोर अन् पक्षविरोधी कार्यकर्ते कोण? 55 ते 60 जणांची यादीच आली समोर
"अर्चनाताई पाटील विजयाच्या जवळ पोहोचल्या होत्या.ती कसर महापालीकेत भरून काढायची आहे. लातूरमध्ये परत कधीही रेल्वेने पाणी आणण्याची गरज लागू नये, असं काम करायचं आहे. 262 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजुर केली आहे.दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देणार आहे.लातूरमधे ट्रॅफिकचा मोठा प्रश्न आहे", असंही फडणवीस म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काय म्हणाले होते?
सोमवारी भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले होते की, "कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही."त्यानंतर लातूरमधील राजकीय वातावरण तापलं होतं. रवींद्र लातूरमधील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. विलासराव यांच्या आठवणी पुसण्याची भाषा करणे हे लातूरच्या अस्मितेचा अपमान असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं होतं. रवींद्र चव्हाण यांनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली होती.
नक्की वाचा >> ठाकरे-पवार बंधूंचं मनोमिलन की राजकीय 'ब्रँड' वाचवण्याची केविलवाणी धडपड? वाचा INSIDE STORY
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world