Woman Viral Video : पेशाने MBBS डॉक्टर असलेल्या मुलीसाठी मुलगा शोधणाऱ्या एका आईचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 32–34 वर्षांचे मुलगे टक्कल पडलेले, लठ्ठ झालेले आणि ‘अंकल'सारखे दिसतात, असं डॉक्टर मुलीच्या आईचं म्हणणं आहे. त्यांच्या विधानानंतर नेटकऱ्यांनी इंटरनेटवर टीकेची झोड उठवली आहे. "मग तुमची 32 वर्षांची मुलगी काय अजूनही लहान आहे का?", अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या महिलेला सुनावलं आहे. लग्नासाठी'अॅमेझॉन'वरून मुले मागवता येतात का? की करिअरच्या स्पर्धेत आपण लग्नाचं योग्य वय मागे सोडून आलो आहोत? असेही प्रश्न लोकांनी या व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत. या व्हिडीओत पाहू शकता की, एक महिला तिच्या डॉक्टर मुलीसाठी वर न मिळाल्याचं दुःख व्यक्त करते. पण मुलांबद्दल तिने जे विधान केलं, त्यावरून ती महिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.
'सर्व लठ्ठ आणि टकले', महिलेनं नेमकं काय म्हटलं?
इन्स्टाग्राम क्रिएटर सोनम सोलंकी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 75 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.व्हिडीओत महिला सांगते की, त्यांच्या मुलीनं शिक्षणात खूप वेळ खर्च केला आणि आता ती एक चांगली डॉक्टर आहे.ती फिट आहे आणि स्मार्ट आहे.मुलीसाठी (जिचं वय 30–32 वर्षांच्या आसपास आहे) तिच्याच प्रोफेशनमधील मुलगे पाहायला सुरुवात केली, पण हाती निराशाच लागली. डॉक्टर मुलीची आई म्हणते, 32-34 वर्षांची मुलं तर अंकलसारखी दिसू लागली आहेत.कोणी टक्कल पडलेलं आहे,तर कोणी लठ्ठ आहे.माझी मुलगी फिट आहे, तिच्यासाठी तसा मुलगा मिळतच नाही.
नक्की वाचा >> "त्यांचे शब्द चुकीच्या पद्धतीने...", रवींद्र चव्हाण-विलासराव प्रकरणावर CM फडणवीसांची सारवासारव, म्हणाले..
इथे पाहा महिलेचा व्हायरल व्हिडीओ
महिलेनं अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर @rose_k01 नावाच्या एक्स यूजरने म्हटलंय की, आजची ही कटू सत्यता आहे. पण कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Real Marriage Problem in finding Match for Girls -"32-34 age Boys have started to look like "Uncles" pic.twitter.com/Cp7P9AhLAX
— Rosy (@rose_k01) January 3, 2026
एका यूजरने म्हटलंय, माणूस हा कोणत्याही फॅक्टरीचा प्रोडक्ट नाही, जो तुम्ही अॅमेझॉनवरून ऑर्डर कराल.पालक करिअर आणि कुटुंब यांच्यात समतोल राखू शकत नाहीत. आजची पिढी 32 वर्षांपर्यंत करिअर घडवते आणि नंतर 32 वर्षांच्या आसपासचं जोडीदार शोधते,जे आता जवळपास अशक्य झालं आहे.
नक्की वाचा >> आईने मुलांना साडी नेसवली, मेकअपही केला..दोघे भाऊ तृतीयपंथी बनून बाजारात गेले, 1 दिवसाची कमाई पाहून सर्वच थक्क
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world