IPL 2025 Auction : मुंबईला मिळाला नवा विकेटकिपर, 1 कोटींच्या बोलीवर घेतलेला रिकल्टन आहे तरी कोण?

दुसऱ्या दिवसाच्या लिलावात मुंबई इंडियन्सने आपली ही गरज पूर्ण करत दक्षिण आफ्रिकेचा युवा विकेटकिपर फलंदाज रायन रिकल्टनला संघात दाखल करुन घेतलं आहे. 1 कोटींच्या बोलीवर रिकल्टन मुंबईच्या संघात दाखल झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

आयपीएलच्या आगामी हंगामासाठीचा लिलाव सध्या सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात सुरु आहे. पहिल्या दिवसाच्या लिलावात ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांना छप्परफाड बोली लागली. ऋषभ पंत 27 कोटींच्या बोलीवर आयपीएलच्या इतिहासातला आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने पहिल्या दिवसाच्या लिलावात ट्रेंट बोल्ट आणि नमन धीर यांना खरेदी केलं.

आतापर्यंत मुंबईचं प्रतिनिधीत्व केलेल्या इशान किशनला पहिल्या दिवसाच्या लिलावात सनराईजर्स हैदराबादने विकत घेतलं. त्यामुळे मुंबई इंडियन्सला आपल्या संघात विकेटकिपरची गरज होती. दुसऱ्या दिवसाच्या लिलावात मुंबई इंडियन्सने आपली ही गरज पूर्ण करत दक्षिण आफ्रिकेचा युवा विकेटकिपर फलंदाज रायन रिकल्टनला संघात दाखल करुन घेतलं आहे. 1 कोटींच्या बोलीवर रिकल्टन मुंबईच्या संघात दाखल झाला आहे.

कोण आहे रायन रिकल्टन?

28 वर्षीय रिकल्टनने याआधी बाहेरील देशांमधील टी-२० स्पर्धांमध्ये आपली चमक दाखवली आहे. SA T-20 लिगमध्ये रिकल्टन हा मुंबई इंडियन्सच्याच मालकीच्या MI Cape Town या संघाकडून खेळतो. याव्यतिरीक्त रिकल्टनने दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचं 7 कसोटी, 5 वन-डे आणि 12 टी-20 सामन्यांचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

कशी राहिली आहे रिकल्टनची कामगिरी?

MLC 2024, SA T-20, Mzansi Super League या महत्वाच्या टी-२० स्पर्धांमध्ये रिकल्टनच्या नावावर 1 हजाराहून अधिक धावा जमा आहेत. MI Cape Town संघाकडून खेळताना रिकल्टनने 17 सामन्यांत 676 रन्स केल्या आहेत. MLC 2024 मधली नाबाद 103 धावांची खेळी ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे.

Advertisement

हे ही वाचा - Border-Gavaskar Trophy - बुमराहची विजयी सलामी, पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव

डावखुऱ्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला रिकल्टन हा टी-२० प्रकारात स्ट्रोक प्लेअर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग ११ मध्ये त्याचा आघाडीच्या फळीत विचार केला जाऊ शकतो.