Nashik Crime : बाकावर बसण्यावरुन वाद; क्लासच्या आवारातच दहावीतील यशराजची निघृण हत्या

नाशिकमध्ये खासगी क्लासमध्ये बाकावर बसण्यावरुन झालेल्या वादातून एका शाळकरी मुलाला जीव गमवावा लागला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

वैभव घुगे, प्रतिनिधी

Nashik Crime News : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये खासगी क्लासमध्ये बाकावर बसण्यावरुन झालेल्या वादातून एका शाळकरी मुलाला जीव गमवावा लागला आहे. ही घटना नाशिकच्या सातपूर भागातून समोर आली आहे. 

नाशिकच्या सातपूर भागातील ज्ञानगंगा क्लासेसमध्ये हा प्रकार घडला. या क्लासेसमध्ये शिकणाऱ्या यशराज गांगुर्डे या दहावीत शिकणाऱ्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. यशराजचा क्लासमध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसोबत बाकावर बसण्यावरुन बुधवारी वाद झाला होता. याच वादातून त्याची हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

नक्की वाचा - Nashik News: विवाहितेने 2 चिमुकल्यांसह विहीरीत घेतली उडी, भयंकर कारण आलं समोर

नेमकं काय घडलं?

यशराजचे त्याच्या क्लासमधील दोन मुलांसोबत बाकावर बसण्यावरुन वाद झाला होता. या वादातून आज यशराजला मारहाण करण्यात आली. तो शिकत असलेल्या खासगी क्लासच्या आवारात  त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या दोघांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीत यशराजचा मृत्यू झाला आहे.  यशराजला हाताच्या चापटी आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत यशराजचा मृत्यू झाला. या प्रकरणात दोघांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. 

Topics mentioned in this article