
Mumbai Crime : पुण्यातील स्वारगेट प्रकरण ताजं असताना महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील जोगेश्वरीत एका 12 वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे. पाच नराधमांकडून एका 12 वर्षांच्या मुलींवर निघृणपणे अत्याचार करण्यात आला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या काकांसोबत राहते. 24 फेब्रुवारी रोजी ही मुलगी बेपत्ता झाली होती. त्यानंतर मुलीच्या काकांनी पोलिसांत अपहरणाची तक्रार दाखल केली होती. त्यातच मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची माहिती आहे.
नक्की वाचा - Swargate Rape Case : स्वारगेट बलात्कार पीडितेसोबत ससून रुग्णालयातही असंवेदनशील कृत्य, संतापजनक घटना
अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून ते AC मेकॅनिक असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पॉस्को अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीला एकटे बघून या आरोपींनी तिला संजय नगर येथील त्यांच्या घरी नेले आणि लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर या लहान मुलीला दादर परिसरात सोडण्यात आलं. पीडित मुलगी दादर परिसरात फिरत असताना काही पोलिसांनी तिला पाहिलं आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणात पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. जमाल, आफताब, महफूझ, हसन, जाफर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world