Pune News : पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ, 22 वर्षीय अविवाहित तरुणीसह तिच्या नवजात बाळाचा मृत्यू, प्रकरण काय?

पिंपरी-चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन एका 22 वर्षीय अविवाहित तरुणीचा आणि तिच्या सात महिन्यांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pimpari Chinchwad Crime News Today
पुणे:

सूरज कसबे, प्रतिनिधी 

Pimpari Chinchwad Crime News Today : पिंपरी-चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन एका 22 वर्षीय अविवाहित तरुणीचा आणि तिच्या सात महिन्यांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून चिंचवड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी सात महिन्यांची गरोदर होती. मात्र याबद्दल तिच्या कुटुंबीयांना कोणतीही कल्पना नव्हती. मंगळवारी सकाळी तरुणीने गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर तिची मुदतपूर्व प्रसूती झाली. प्रसूतीनंतर तरुणीला प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाल्याने तिची प्रकृती खालावली. त्यानंतर तिला पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. दुसरीकडे, नवजात बाळाला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान काही तासांतच दोघांचाही मृत्यू झाला.

Advertisement

नक्की वाचा >> Pune News : 5 लाख विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित, सावित्रीबाई फुले विद्यापीठात काय घडलंय? विद्यार्थी रस्त्यावर

पोलिसांचा संशय बळावला

या प्रकरणात अनेक संशयास्पद बाबी समोर येत आहेत. तरुणीचा मोबाईल फोन फॉरमॅट केलेल्या अवस्थेत आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे. या तरुणीला गर्भपाताच्या गोळ्या कोणी पुरवल्या ? तिच्या मोबाईलमधील डेटा कोणी आणि का नष्ट केला ? यामागे कोणाचे दडपण होते का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चिंचवड पोलिसांनी तपासचक्र फिरवले आहे. मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा >> Pune News: पुण्यात खळबळ! प्रांत अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, नेमका कुठे घडला हा प्रकार?