यशश्रीच्या निर्घृण हत्येने उरण हादरले; संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट, आरोपीचा शोध सुरु

शुक्रवारी रात्री उरण-पनवेल रेल्वे मार्गालगतच्या या तरुणीची मृतदेह सापडला. यशश्री शिंदे असं मृत तरुणीचं नाव आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मेहबूब जमादार, रायगड

रायगडच्या उरणमध्ये 22 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणीचे अवयव कापून तिची हत्या करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री उरण-पनवेल रेल्वे मार्गालगतच्या या तरुणीची मृतदेह सापडला. यशश्री शिंदे असं मृत तरुणीचं नाव आहे. 

मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तेव्हापासून नातेवाईक व उरणमधील नागरिकांना रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे. सर्वच स्तरातून या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. घटनेच्या निषेधार्थ उरण शहरातील बाजारपेठ बंद करण्यात आली. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

माझ्या मुलीची हत्या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याने केल्याचा आरोप यशश्रीच्या वडिलांनी केला आहे. आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत  मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांच म्हणणे. 25 जुलैपासून यशश्री शिंदे ही बेपत्ता होती. सकाळी 11 वाजता मैत्रिणीकडे गेल्यापासून यशश्री बेपत्ता असल्याचे नातेवाईकानी सांगितले. सहाय्यक पोलीस आयुक्त ग्रामीण रुग्णालयात पोहचले असून नातेवाईकांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नक्की वाचा- नवी मुंबई इमारत दुर्घटना, 'तो' रिक्षा ड्रायव्हर नसता तर 40 जणांचा जीव गेला असता?

आरोपीच्या शोधासाठी 3 पथके तयार

पहाटे उरण रेल्वे स्टेशनसमोर एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. तरुणी बेलापूरला नोकरीला होती. हाफ डे घेऊन ती लवकर निघाली होती. दुपारी 3-4 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली असावी अशी शक्यता आहे. आरोपी निष्पन्न झालेला नाही. 3 पथके आरोपीला शोधण्यासाठी  तयार करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने देखील एक पथक तयार केले आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.

Advertisement

(नक्की वाचा - भिवंडीत 6 वर्षीय चिमुकल्याची हत्या; आरोपीला काही तासात अटक, हत्येचं कारणही समोर)

पोलीस दोन दिवसापासून या बाबतीत तपास करत आहेत. त्यांचं आश्वासन आहे म्हणून हा जमाव, समाज शांत आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून शांत आहे, परंतु आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हाही या प्रयत्नात सर्वजण आहेत. पीडित कुटुंबासोबत आम्ही सर्वजण आहोत, असं आमदार महेश बालदी यांनी म्हटलं. तर माजी आमदार मनोहर भोईर यांनी सदर आरोपीला समाजाच्या हाथी द्या, अशी संतप्त मागणी केली आहे. 

Topics mentioned in this article