'20 टास्क पूर्ण करा पार्ट टाइम जॉब मिळवा'; 'सुचित्रा'च्या नावाखाली तरुणाची मोठी फसवणूक, बँक खातं झालं रिकामी

टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पार्ट-टाईम जॉब देण्याचं आमिष दाखवून उलवेतील ३९ वर्षीय पुरुषाची तब्बल 34,39,777 रुपयांची फसवणूक झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कांबळे, प्रतिनिधी

टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पार्ट-टाईम जॉब देण्याचं आमिष दाखवून उलवेतील ३९ वर्षीय पुरुषाची तब्बल ३४,३९, ७७७ रुपयांची फसवणूक झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी उलवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी जगनकुमार रामाराव सरदेव (रा. सेक्टर ९, उलवे) यांच्याशी टेलिग्रामवरील Suchithra (@Suchithra_P) या आयडीवरून तसेच व्हॉट्सअॅप क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. पार्ट-टाईम जॉबचे आमिष दाखवून ‘दररोज 20–40 टास्क पूर्ण केले तर आकर्षक नफा मिळेल' असे सांगण्यात आले.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला दोन संशयास्पद वेबसाईट लिंक पाठवल्या —

uniqlo-fashionfranchise.com

familycloth-uniq.com

नफ्याचं आश्वासन अन् मोठी लूट

या वेबसाईटवर अकाउंट निर्माण करून टास्क पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला पैसे जमा करण्यास भाग पाडण्यात आले. टास्क पूर्ण केल्यानंतर नफा देण्याचे आश्वासन देत आरोपींनी हप्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम भरून घेतली. फिर्यादीने पैसे परत मागितल्यावर “टास्क अपूर्ण आहे”, “अजून रक्कम जमा करा” अशा कारणांनी सतत अतिरिक्त पैसे भरायला लावले. शेवटी एकूण 34.39 लाखांचे नुकसान झाल्यानंतरही रक्कम न मिळाल्याने फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली.

नक्की वाचा - Sangli News : सरकारी नोकरीसाठी 40 लाख रुपये भरले; मग कळले, 'तो' आदेश बनावट! मंत्र्याच्या नावानं मोठा फ्रॉड?

Advertisement

फिर्यादीने खालील आयडींनी फसवणूक केल्याचे नमूद केले आहे :

Suchithra – @Suchithra_P

Financial Consultant – @FC_uniqlo355

नवी मुंबई सायबर पोलिसांचे आवाहन

मुंबई व नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ऑनलाइन जॉब, टास्क किंवा गुंतवणुकीच्या नावाखाली कोणत्याही अनोळखी लिंक, नंबर किंवा आयडीवर विश्वास ठेवू नका. सायबर गुन्ह्यांची मदत व तक्रारीसाठी 1930 या राष्ट्रीय हेल्पलाइनवर किंवा नवी मुंबईतील नेरुळ सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

Topics mentioned in this article