Nagpur Crime : रस्ते खोदकामादरम्यान आढळले 4 मानवी सांगाडे; रात्रीच्या अंधारात धक्कादायक प्रकार उघड

भररस्त्याखाली चार मृतदेह गाडले होते, या वृत्ताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

Nagpur Crime : नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सध्या राज्यभरात रस्ते दुरुस्तीचं काम सुरू आहे. नागपुरातही बेसा पॉवर हाऊसजवळ रस्त्याचं काम सुरू होतं. रस्त्यांच काम सुरू असताना जेसीबीने खोदकाम सुरू होतं. यादरम्यान असं काही आढळलं की कामगारांना धक्काच बसला. (4 human skeletons found)

जेसीबीने खोदकाम करीत असताना चार मानवी सांगाडे मिळाले आहेत. सक्कररा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. त्यांच्याकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. हे सांगाडे नेमके कोणाचे आहे, हे कळू शकलेलं नाही. मात्र भररस्त्याखाली चार मृतदेह गाडले होते, या वृत्ताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

नक्की वाचा - लेकीच्या जबाबामुळे आईचं बिंग फुटलं; पतीच्या हत्येचा भयंकर प्लान आखणारा सौंदर्याचा क्रूर चेहरा

नागपुरात उड्डाण पुलाच्या निर्मितीकरिता खोदकाम सुरू असताना सापडला मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. जेसीबीचा पंजा मानवी कवटीला लागल्याचे आढळून आले म्हणून मशीन ऑपरेटरने काम थांबवले. सक्करदरा पोलिसांना सूचना देण्यात आली आहे. पोलीस इन्स्पेक्टर मुकुंद ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने मोठ्या काळजीपूर्वक बऱ्यापैकी कुजलेल्या अवस्थेत सांगाडा बाहेर काढला. काही आठवड्यापूर्वी पुरण्यात आला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टम करिता पाठविण्यात आलं आहे. उशीरा रात्रीपर्यंत निर्माण कार्यातील कामगार, तसेच परिसरातील रहिवाशांचे जबाब नोंदवून घेण्यात येत होते.

Advertisement

Topics mentioned in this article