लपंडाव खेळताना चिमुरडी घरात लपली; नराधमाने आत ओढलं, कडी लावली अन्...; संतापजनक प्रकार

जळगावमध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकाराचा आता उलगडा झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
जळगाव:

महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहे. अनेकदा लहान मुलं याविषयी बोलत नाहीत किंवा बऱ्याचदा त्यांच्यासोबत काय घडतंय हेच त्यांचा लक्षात येत नाही. परिणामी भविष्यात त्यांना मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागतं. कारण बालमनावर झालेला आघात हा कधीही न पुसणारा असतो. बदलापुरातील (Child Abuse cases) घटनेनंतर हा धोका लक्षात घेऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. 

काही दिवसांपूर्वी जळगावमध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकाराचा आता उलगडा झाला आहे. आपल्या घराजवळ लंपडावाचा खेळ खेळणाऱ्या एका 11 वर्षांच्या मुलीवर एका 40 वर्षीय नराधमाने लैंगिक शोषण केलं आहे. लंपडाव खेळताना लपण्यासाठी म्हणून ती घरात गेली आणि येथेच नराधमाने डाव साधत त्या मुलीचे लचके तोडले. 

Advertisement

नक्की वाचा - Badlapur Crime : अक्षय 'लिंगपिसाट आणि हैवान'; पहिल्या पत्नीचा जबाब ठरणार टर्निंग पाँईंट

जळगाव मध्ये लपंडाव खेळत असताना घरात लपलेल्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 40 वर्षीय नराधमांकडून अत्याचार करण्यात आला. मित्र-मैत्रिणींसह लपंडाव खेळत असताना 11 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात लपल्याचे पाहून नराधमाने मुलीला घरात कोंडून तिच्यावर अत्याचार केला. अल्पवयीन मुलीने विरोध केला असता नराधमाने अल्पवयीन मुलीला जिवे ठार मारण्याची दिली धमकी दिली. काही दिवसांनी सदर प्रकार आई-वडिलांच्या लक्षात आल्यानंतर रामानंद पोलिसात संशयित सिद्धार्थ वानखडे याचा विरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर फरार झालेल्या सिद्धार्थ वानखडे या संशयीताला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे.  

Advertisement

नक्की वाचा - 14 वर्षांच्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार, आईचं दुर्लक्ष; शिक्षिका-पोलीस दीदीमुळे पुण्याच्या लेकीची सुटका!

त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लपंडाव खेळत असताना घरात लपलेल्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 40 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव मध्ये समोर आला असून मित्र-मैत्रिणींसह लपंडाव खेळत असताना 11 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात लपल्याचे पाहून नराधमाने मुलीला घरात कोंडून तिच्यावर अत्याचार केला, दरम्यान अल्पवयीन मुलीने आरडाओरडा केला असता नराधमाने मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला. काही दिवसांनी सदर प्रकार आई-वडिलांच्या लक्षात आल्यानंतर याप्रकरणी रामानंद पोलिसात संशयित सिद्धार्थ वानखडे यांच्या विरोधात पुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेनंतर फरार झालेल्या सिद्धार्थ वानखडे या संशयितास पोलिसांनी मुंबईमधून अटक केली आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली असून संशयिताला आज न्यायालयात हजर केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 

Advertisement

Topics mentioned in this article