जाहिरात
This Article is From Aug 30, 2024

14 वर्षांच्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार, आईचं दुर्लक्ष; शिक्षिका-पोलीस दीदीमुळे पुण्याच्या लेकीची सुटका!

14 वर्षांच्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार, आईचं दुर्लक्ष; शिक्षिका-पोलीस दीदीमुळे पुण्याच्या लेकीची सुटका!
पिंपरी-चिंचवड :

बदलापूरमधील बाल लैंगिक (Badlapur Child Abuse) अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील अनेक जिल्ह्यातून बाल लैंगिक अत्याचारांच्या घटना उघडकीस येत आहेत. उद्योग नगरी पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरामध्ये प्रियकरानेच त्याच्या प्रियसीच्या 14 वर्षाच्या मुलीसोबत अनैसर्गिक कृत्य केल्यानं शहरात एकच खळबळ उडालीय. (Pune Crime News)
    
या प्रकरणी रावेत पोलिसांनी पंकज बाबुराव धोत्रे या 45 वर्षीय प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. पीडित मुलीची आई आणि तिचा प्रियकर धोत्रे हे दोघे एकाच ठिकाणी काम करतात. 2019 पासून या प्रियकराचे तिच्या घरी सारखे येणे जाणे होते. पीडित मुलीची आई आणि तिची दोन मुले ही वडिलांपासून गेली अनेक महिने विभक्त राहत होती. त्याचवेळी त्याचे प्रेम संबंध जुळले. याचाच गैर फायदा घेत नराधम धोत्रे यांनी पीडित मुलीसोबत आधीही अशाच प्रकारचे अत्याचार केले होते. झालेला प्रकार पीडित मुलीने तिच्या आईला सांगितलं. त्यानंतर आईने तुला असा भास झाला असे म्हणून दुर्लक्ष केलं. आईचा प्रियकर तिच्या अल्पवयीन लेकीचं लैंगिक शोषण करीत होता. 

नक्की वाचा - Badlapur Crime : अक्षय 'लिंगपिसाट आणि हैवान'; पहिल्या पत्नीचा जबाब ठरणार टर्निंग पाँईंट

त्यानंतर काही दिवसांपूर्वी पुन्हा पीडित मुलीची आई आणि भाऊ घरी नसताना त्यानं या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्यानं या पीडित मुलीने अखेर हिंमत दाखवत झालेला सर्व प्रकार आपल्या वर्ग शिक्षिकेला सांगितला. त्यानंतर तत्काळ पीडित मुलीच्या शिक्षिकेने याबाबत पोलीस दीदींनी याबाबत कळवत या नराधम प्रियकर धोत्रेच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार कायदा 7,8,11 आणि 12 तसेच भारतीय न्याय संहिता 74 आणि 75 नुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.