शुभम बायस्कर, प्रतिनिधी
Amravati Gangrape Crime News : अमरावती जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. 18 वर्षीय तरुणी मित्रासोबत दुचाकीवरून जात होती. त्याचदरम्यान 5 जणांनी त्यांना अडवलं अन् जंगलात नेऊन तरुणीसोबत सामूहिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील भानखेडा गावाजवळील जंगलातील घडली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 5 संशयित आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिचा मित्र दुचाकीवरून जात असताना 5 लोकांनी त्यांना अडवलं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पीडितेच्या मित्राच्या खिशातील 120 रुपये काढले. त्यानंतर एकाने अत्याचार केला. या घटनेनंतर पीडितेची प्रकृती खालावली. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या पीडितेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
नक्की वाचा >> Beed News : बीडमध्ये खळबळ! वाल्मिक कराड असलेल्या कारागृहात एका कैद्याचा मृत्यू, काय घडलं?
अमरावती शहर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे काय म्हणाले?
"28 मार्च 2026 रोजी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास पोलीस ठाणे फ्रेजरपुरा हद्दीतील भानखेडा या गावाकडे जाणाऱ्या रोडवर जंगल परिसरामध्ये एक तरुण आणि त्याची मैत्रिणी वाहनाने जात होते.पाच लोकांनी त्यांना अडवले. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्याकडून 120 रुपये काढून घेतले.त्याचबरोबर त्यातील एका आरोपीने त्या पीडितेवर लैंगिक शारीरिक अत्याचार केले", अशी माहिती अमरावती शहर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.