Pune News : मावळ हादरलं! घरातून बेपत्ता झालेल्या 5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या

मावळ परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.घरातून बेपत्ता झालेल्या अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Crime News Today
पुणे:

सूरज कसबे, प्रतिनिधी

Pune Maval Rape News : मावळ परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.घरातून बेपत्ता झालेल्या अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली असून संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे. समीर कुमार मंडळ असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. 

पीडित मुलगी घरातून बेपत्ता झाल्यावर घडलं सर्वात भयंकर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित मुलगी शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घरातून अचानक बेपत्ता झाली होती. आई कामावरून परतल्यावर संबंधीत घटनेबाबत तिला समजलं. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. पीडित अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी समीरने तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केली. आरोपी 35 वर्षांचा असून तो विवाहित असल्याची माहिती आहे. 

नक्की वाचा >> Eknath Shinde: 'मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकैत कोण?', निवडणुकीआधीच शिंदेंनी उडवली खळबळ!

पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज सकाळी आरोपीकडे कसून तपास केला आणि त्यानंतर ही धक्कादायक माहिती उघडकीस आली.त्यानंतर पोलिसांनी आरोपी समीर कुमार मंडळला बेड्या ठोकल्या. संपूर्ण मावळ परिसरात या क्रूर घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. 

Topics mentioned in this article