Sangli News: 6 जणांनी सुरू केली 'या' नावाची कंपनी, एकाला 1 कोटी 33 लाखांचा गंडा, सांगलीतील मोठं कांड आलं समोर

गली रत्नागिरी येथील सहा जणांनी मिळून TWJ नावाची कंपनी स्थापन केली होती.या गुंतवणूक कंपनीच्या माध्यमातून एका व्यक्तीला 1 कोटी 33 लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
TWJ Company Money Fraud News

शरद सातपुते, प्रतिनिधी 

Sangli Crime News Today : सांगली रत्नागिरी येथील सहा जणांनी मिळून TWJ नावाची कंपनी स्थापन केली होती.या गुंतवणूक कंपनीच्या माध्यमातून एका व्यक्तीला 1 कोटी 33 लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी, सांगलीतील 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुंतवणुकीवर 4 टक्के परतावा देण्याच्या आमिषाने ही फसवणूक करण्यात आली आहे. गुंतवणुकीवर चार टक्के परतावा देण्याच्या आमिषाने सांगलीतील एकाला तब्बल 1 कोटी 33 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली. याप्रकरणी सुधीर धोंडीराम चंदुरे (रा.आरग) यांच्या तक्रारीनुसार रत्नागिरी आणि सांगलीतील 6 जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंतवणूक केल्यास कंपनीकडून 4 टक्के परतावा

रत्नागिरीतील समीर नार्वेकर,नेहा नार्वेकर तर सांगलीतील किरण कुंडले,चेतन खोत,महेश झाडबुके,स्नेहा खोत या सहा जणांनी टीडब्ल्यूजे असोसिएट्स प्रा.लि.नावाची कंपनी स्थापन केली होती.या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास कंपनीकडून 4 टक्के परतावा देण्यात येत होता.कंपनी सुरू झाल्यानंतर कंपनीकडून काही जणांना परतावाही देण्यात आला.त्यानुसार सर्व संशयितांनी सुधीर चंदुरे यांना यामध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले होते. 

Advertisement

नक्की वाचा >> Kalyan News : कल्याणच्या 'या' भागात MOMOS विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला, घटनेमागचं कारण पाहून सर्वांना बसला धक्का

त्यानुसार त्यांनी संबंधित कंपनीमध्ये तब्बल 1 कोटी 33 लाख रुपयांची गुंतवणूक केली.परंतु, जुलै 2021 पासून सुधीर चंदुरे यांनी गुंतवलेल्या रक्कमेवर त्यांना कोणताही परवाना देण्यात आला नाही.तसेच गुंतवलेली रक्कम परत न दिल्याने फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे.सुधीर चंदुरे यांनी सहा जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.दरम्यान, या कंपनीकडून अनेकांना गंडा घालण्यात आला असून फसवणुकीचा प्रकार पुन्हा घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नक्की वाचा >> Mumbai Video: 40 रुपयांसाठी Uber चालकाचं महिलेसोबत गैरवर्तन, मुंबईचा व्हिडीओ व्हायरल, कंपनीने उचललं मोठं पाऊल