मावळच्या तळेगाव - दाभाडे शहरात गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. शहरात सहा जणांच्या टोळक्याने गोळीबार करत दहशत निर्माण केली आहे.हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. या घटनेनंतर शहरात दहशतीचे वातावरण आहे. दोन दुचाकीवर हे टोळके आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होते. तर हातात पिस्तुल होते. रात्री सव्वा आठच्या दरम्यान हा प्रकार घडला. गोळीबार केल्यानंतर हे टोळके गायब झाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुणे आणि पिपंरी चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी कोयता गँगची दहशत आहे. त्यात आता बाजूच्याच तळेगाव - दाभाडेमध्येही फायरींग करणाऱ्या टोळक्याची दहशत पाहायला मिळाली आहे. गुरूवारी रात्री साडे आठच्या सुमारास दोन दुचाकी शहरात घुसल्या. प्रत्येक दुचाकीवर तीघे जण बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होते. तर हातात पिस्तुल होती. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत या टोळक्याने दहशत माजवली. जवळपास चार ठिकाणी फायरींग केली. शाळा चौक, राजेंद्र चौक,मारुती चौक,गजानन महाराज मंदिराजवळ या टोळक्याने गोळीबार केला.
ट्रेंडिंग बातमी - शिवसेना- भाजप वाद पेटला? कदमांच्या आरोपांना भाजपचे थेट उत्तर
शहरात असलेल्या शाळा चौक येथे आरोपींनी दोन गोळ्या झाडल्या.उर्वरित तीन ठिकाणी प्रत्येकी एक गोळी झाडली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक तळेगाव- दाभाडे शहरात दाखल झाले. त्यांनी घटना स्थळाची पाहणीही केली. शिवाय स्थानिक पातळीवर सीसीटीव्ही फुटेजही मिळवले. त्यात हे टोळके दिसून आले. फायरींग केल्यानंतर हे टोळके फरार झाले आहेत. हे नेमके कोण होते हे समजू शकले नाही. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. शिवाय फायरींग करण्याचा त्यांचा उद्देश काय होता हेही तपासले जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world